loader image
[ays_poll id=7]

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

Jan 19, 2024

सौ.अंजुमताई कांदे यांची “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस भेट

गुरुवार 18 जाने
साकोरा येथील जि. प.शाळेस भेट देऊन आदर्श शाळेची पाहणी सौ.अंजुम कांदे यांनी केली, या वेळी विद्यार्थी व शिक्षकांशी विविध विषयांवर चर्चा केली.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विद्यार्थ्यांना पत्र शाळेतील विद्यार्थीनीने वाचून दाखवले.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोग्य स्पर्धात्मक वातावरणातील विद्यार्थ्यांना शिकण्याची आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे.
सदर योजनेचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन अध्यापन व प्रशासन, यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन देणे आहे. शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती क्रीडा आरोग्य वैयक्तिक परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणे आहे.
या प्रसंगी तालुकास्तरावरील मूल्यांकन समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी श्री.संदिप दळवी , गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले , मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, संगीता ताई बागुल, रोहिणी ताई मोरे, सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अंजुमताई कांदे‌ यांनी आदर्श शाळेची पाहणी करुन शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. अशाच प्रकारे तालुक्यातील सर्व शाळा आदर्श शाळा करण्यासाठी आमदार कांदेंच्या माध्यमातून सर्वोतपरी प्रयत्न करु असे आश्वासित केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
.