Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील मराठा बांधवांना मराठा महासंघातर्फे आवाहन

Jan 20, 2024

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आंतरवाली सराटी येथून पदयात्रेद्वारे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी प्रस्थान करणार आहेत या मराठा आरक्षण आंदोलनात नांदगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव सर्व धर्मीय मराठा आरक्षण समर्थक आणि मराठा आरक्षण हितचिंतक हजारोंच्या संख्येने आपापली वाहने घेऊन जळगाव खुर्द येथून शनिवार दिनांक 20 जानेवारी सकाळी नऊ वाजता प्रस्थान करणार आहे सोबतच पिंपरखेड, परभणी, ढेकू,जातेगाव, लोडरे, बोलठाण या गावांमध्ये जनजागृती करून सोबत येणाऱ्या समाज बांधवांना घेऊन न्यायडोंगरी येथे रात्रीचा मुक्काम करून दिनांक एकवीस जानेवारी रविवारी सकाळी नऊ वाजता न्यायडोंगरी येथून सुरुवात करून बिरोळे, सावरगाव, पळाशी, आमोदे, मळगाव, कळमदरी, जामदरी, न्यू पांझन या गावांमध्ये जनजागृती करून साकोरा येथे दुसरा मुक्काम करणार आहे. दिनांक 22 जानेवारी सोमवारी साकोरा येथून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात करून वाटेत लागणारी गावे चांदोरा,मुलडोंगरी, रणखेडा, डॉक्टरवाडी, पोखरी, तांदूळवाडी, टाकळी,माणिकपुंज,भानगाव, मोरझर, वडाळी, भालूर, लक्ष्मी नगर या गावांमध्ये जनजागृती करून मांडवडे येथे तिसरा मुक्काम करून मांडवड येथून मंगळवार दिनांक 23 तारखेला सकाळी नऊ वाजता प्रस्थान करून दहिगाव,नांदगाव ईश्वर जोंधळवाडी, शास्त्रीनगर,धनेर, नागापूर या गावांमध्ये पदयात्रा करून मनमाड येथे चौथा मुक्काम करून मनमाड मधून बुधवार दिनांक 24 तारखेला सकाळी अकरा वाजता नाशिक येथे जाण्यासाठी प्रस्थान करणार आहे. या मुंबई दर्शन यात्रेत फक्त वाटेतील गावांमध्येच पदयात्रा करण्यात येणार असून उर्वरित सर्व प्रवासा सोबत असलेल्या ट्रॅक्टर फोर व्हीलर मोटरसायकल टेम्पो ट्रक इत्यादी वाहनांद्वारे करण्यात येणार आहे मराठा आरक्षणाची अंतिम टप्प्यात आलेली ही अखेरची लढाई असून सर्व समाज बांधवांनी संपूर्ण ताकतीने या हक्काच्या लढाईत सामील व्हायचे आहे मुंबई येथे पोहोचल्यानंतर आरक्षण घेऊनच परतायचे आहे यात हलगर्जीपणा झाल्यास आपल्याला मनोज जरांगे पाटील यांचे पार्थिव घेऊन परतावे लागेल याची गांभीर्याने नोंद समाजाने घ्यायची आहे ही घटना समाजाला परवडणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन इतिहासानंतर साडेतीनशे वर्षांनी मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा कुणबी समाज प्रथमच एकत्र आला आहे समाज एकत्र आल्यामुळे शासनाला 54 लाख नोंदी शोधाव्या लागल्या या 54 लाख नोंदणीच्या पुराव्यांवरून जवळपास अडीच ते तीन कोटी समाज बांधव ओबीसी मध्ये समाविष्ट होणार आहे समाज एकत्र आल्यामुळे आपले कोण, परके कोण हे समाजाला उघड्या डोळ्यांनी पाहता आले समाज एकत्र आल्यामुळे समाजाची राजकारणात राजकीय दहशत निर्माण होऊन शासनावर एक दबाव गट निर्माण झाला या आणि अशा अनेक गोष्टींचा अप्रत्यक्ष फायदा समाजाला झालेला आहे यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे नांदगाव तालुक्याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की प्रत्येक समाज बांधवांनी यातील आपापली जबाबदारी ओळखून स्वतःहून स्वीकारून पूर्ण करावयाची आहे जे समाज बांधव सोबत असणार नाही त्यांनी आंदोलनास शक्य असेल ती मदत करावी या मराठा आरक्षण आंदोलनात जी लोक समाजाला मदत करणार आहेत समाज त्यांना आपल्या मनात हृदयात ठेवणार आहे जी लोक सक्षम असताना मदत करणार नाहीत आंदोलनात सहभाग देणार नाहीत आंदोलनात खोडा घालण्याची काम करतील त्या लोकांना समाज डोक्यात ठेवून त्यांचा वेळेवर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही अशी ठाम भूमिका समाजाने स्वीकारली आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि आंदोलनाला शक्य ती मदत देण्यासाठी 8888225544 या हेल्पलाइनची मदत घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात येत आहे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी भास्कर झाल्टे, विशाल वडघुले,विष्णू चव्हाण, सुनील मस्के, निवृत्ती खालकर,जनार्दन पगार,बाबासाहेब सरोदे व त्यांचे सहकारी मित्र आणि भीमराज लोखंडे इत्यादी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]