loader image

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड चे महत्वपूर्ण गौरवास्पद योगदान  देव,धर्म आणि राष्ट्र कार्याची स्वप्न पूर्ती ➖नितीन पांडे

Jan 21, 2024




मनमाड – सोमवार 22 जानेवारी 2024 (पौष शुद्ध द्वादशी )विश्वा तील सर्व हिंदू बांधवान साठी ऐतिहासिक पवित्र क्षण 1528 साली हल्लेखोर बाबर चा सरदार मिरबाकी याने प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी वरील मंदिर तोडून तेथे बाबरी ढाचा उभा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर 496 वर्ष ही राम जन्मभूमी मुक्त करण्या साठी या भारत भूमीवर सातत्याने हजारो आंदोलने झाली त्यातील सन 1990 व 1992 मध्ये झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनात मनमाड शहराचे देखील मोठे योगदान राहिले आहे. 1986 साली जानेवारी महिन्यात मनमाड शहरात प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार व धर्म रक्षण कार्य करण्यासाठी ओम मित्र मंडळाची स्थापना झाली आणि 1986 साली वादग्रस्त श्रीराम जन्मभूमी च्या मंदिरचे दरवाजे दर्शन साठी उघण्यात आले श्रीराम जन्मभूमी मुक्त व्हावी म्हणून 1986 सालीच ओम मित्र मंडळाच्या माध्यमातून मनमाड शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली.आज 1986 ते 2024 गेली 38 वर्ष ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड या श्रीराम सेवा कार्यात कार्यरत आहे समिती तर्फे मनमाड शहरात 1986 साला पासून श्रीराम नवमी निमित्ताने जन्म उत्सव आणि भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणुक चे आयोजन सुरु करण्यात आले पहिल्यांदा सुरु झालेल्या या मिरवणुकीत हिंदुत्ववादी घोषणा दिल्या म्हणून अनेक श्रीराम भक्तांन वर गुन्हे दाखल करण्यात आले पण श्रीराम भक्तांनी ही चळवळ सुरूच ठेवली श्रीराम जन्मभूमी न्यास आणि विश्व हिंदू परिषद ने 1989 साली नोव्हेंबर महिन्यात श्रीराम शिला पूजन कार्यक्रम जाहीर केला मनमाड शहरात मुख्य गुरुद्वारामध्ये विश्‍व हिंदू परिषद व ओम मित्र मंडळ संचलीत श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे शिलापूजनाचा मुख्य कार्यक्रम झाला आणि खर्‍या अर्थाने श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी मनमाड शहरातून कार्य सुरु झाले.याच वेळी मनमाड शहरात विश्‍व हिंदू परिषदे तर्फे श्रीराम कारसेवा समितीची स्थापना करण्यात आली.ऑक्टोबर 1990 साली भाजपा नेते आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांनी श्री क्षेत्र सोमनाथ ते श्री क्षेत्र अयोध्या अशी श्रीराम रथ यात्रा काढली होती या रथ यात्रेला अडवून त्यांना समस्तीपूर बिहार मध्ये अटक करण्यात आली त्या दिवशी मनमाड शहरात ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती व सर्व हिंदुत्ववादी संघटना नी प्रचंड मोठया निषेध मोर्चा चे आयोजन केले होते सन 1990 साली झालेल्या अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची लढाई ही जगाच्या इतिहासात सुवर्णक्षरांंनी लिहिली जाईल अशी होती. याच 1990 च्या आंदोलनात मनमाड शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या माध्यमातून हिंदूत्वाचे सक्रियतेने कार्य करणारे नितीन पांडे,नाना शिंदे अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट, , आमिष परिक व स्वर्गीय संजय भावसार स्वर्गीय पंकज जाधव हे सात श्रीराम कारसेवक अनिल चांदवडकर या वाहिनीप्रमुखाच्या नेतृत्त्वात अयोध्येकडे रवाना झाले. संपूर्ण देशभरामध्ये हिंदू विरोधी संवेदनाक्षम वातावरण,देशात व्ही पी सिंग यांचे तर उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह यांचे हिंदूविरोधी सरकार असतांना या कारसेवेत सहभाग नोंदवणे हे देखील एक मोठया धाडसाचे काम होते. हे सात कारसेवक दि.24 ऑक्टोबर 1990 साली मनमाड येथून गनिमी काव्याने प्रवास करीत झाशीला पोहचले. परंतु झाशी शहरात संचारबंदी असल्याने फार काळ त्यांना थांबता आले नाही. पुढे रेल्वे मार्गाने यूपी पोलीसाचा सिसेमीरा चुकवीत वाराणसी(काशी )नगरीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी देखील संचारबंदी होती. दोन दिवस त्याठिकाणी एका शाळेत मुक्काम केल्यानंतर मनमाडच्या या कारसेवकांना अयोध्या कडे जाण्याचा ध्यास होता पण संचार बंदी सुरूच असल्यामुळे कोणताही पर्याय नसल्याने मनमाडच्या या कारसेवकांनी वाराणसीच्या रस्त्यावर येवून भर संचार बंदी मध्ये श्रीरामाच्या नावाने प्रचंड जयघोष केला त्यांचा जयघोष सुरु असताना उत्तर प्रदेश पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या सात कारसेवकांना अटक केली . मोठ्या संख्येने कारसेवकांना अटक झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील कारागृहे पूर्ण पणे भरली होती. उत्तर प्रदेश पोलीसांनी या मनमाडच्या कारसेवकांना अयोध्येपासून 250 कि.मी.दुर असणार्‍या गाझीपूर जिल्ह्यात नेले व त्या ठिकाणी जे.पी.मेहता इंटरनॅशनल इंजिनिअरींग कॉलेज या आस्थायी कारागृहात दाखल केले. या कॉलेजला चारही बाजूने यूपी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अशा या आस्थायी कारागृहात मनमाडच्या या सात कारसेवकांनी 16 दिवस काढले. पण सर्वांचे एकच ध्येय होते की अयोध्या गाठायची त्यानंतर गाझीपूर शहरातील श्री नामदेव मुंबईवाले या मराठी माणसाच्या मदतीने कारागृहातून पलायन करण्याची योजना आखली त्यासाठी वाहन व्यवस्था केली आणि अतिशय गुप्त मार्गा ने पोलीससांचा कडेकोट बंदोबस्त तोडून रात्री तीन वाजता या कारागृह तून पालायन केले काही प्रवास वाहनाने केला पण ठीक ठिकाणी पोलीस चेक पोस्ट असल्यामुळे त्या वाहन धारकांने अलिगड शहरा बाहेर सोडले आणि पुढे जाण्यासाठी नकार दिला अतिशय बिकट प्रसंग अनोळखी प्रदेश प्रचंड पोलीस बंदोबस्त सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत पोलीस यंत्रणा ची नजर चुकवीत अलिगड शहरात काढले त्यानंतर काही ग्रामीण हिंदू बांधवान च्या मदतीने अयोध्या कडे पायी प्रवास सुरु केला ग्रामीण भागातून चार दिवस व तीन रात्र मुक्काम करीत तर सुमारे 205 कि.मी. चा प्रवास हा पायी केला आणि अयोध्या गाठली. दोन दिवस अयोध्या येथे मुक्काम करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेवून हे सात कारसेवक मनमाड येथे आले याच बरोबर रमाकांत मंत्री, किरण कात्रे, रामधनी यादव, राजेंद्र पांडे यांनी देखील या कारसेवेत सहभाग नोंदवला यानंतर विश्‍वहिंदू परिषद व श्रीराम कारसेवक समिती व ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रसिद्ध किर्तनसम्राट बाबा महाराज सिन्नरकर मनमाड गुरुद्वारा प्रबंधककमिटी चे प्रमुख बाबा अजैबसिंह, राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचे शहर संघ चालक स्वर्गीय रामकिसन झंवर, दत्तोपासक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय बापूसाहेब दातार, आदी मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात नितीन पांडे, अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट, नाना शिंदे यांनी आपल्या संघर्षमय आंदोलनातील अनुभवांचे कथन केले. 
सन 1992 कारसेवा
सन 1992 साली 6 डिसेंबर रोजी झालेल्या अयोध्या येथील ऐतिहासिक श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये मनमाड शहरातून स्वर्गीय प्रभाकर थत्ते (बाबा थत्ते) कारसेवा वाहिनी प्रमुख यांच्या नेतृत्त्वामध्ये नितीन पांडे, अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट, प्रशांत वीरगावकर , श्रीमती सुनंदा प्रभाकर थत्ते, कु.दिपा थत्ते(पाटील ), निळकंठ त्रिभूवन,सुवर्णा धर्माधिकारी (देशपांडे )आदी कारसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये नितीन पांडे, अनिल चांदवडकर, प्रज्ञेश खांदाट हे तीन असे कारसेवक असे आहेत की ज्यांनी सन 1990 व सन 1992 या दोन्ही आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. सन 1992 च्या कारसेवेत मनमाड चे कारसेवक 20 नोव्हेंबर 1992 रोजी च अयोध्या येथे दाखल झाले होते अयोध्या नगरी पासून चार किमी अंतरावर कापडी टेन्ट द्वारे कारसेवा पुरम निर्माण करण्यात आले होते संपूर्ण विश्वातून या कारसेवे साठी सुमारे चार लाख पेक्षा जास्त श्रीराम भक्त जमा झाले होते, कार सेवकां मध्ये प्रचंड उत्साह होता संपूर्ण अयोध्या श्रीराम च्या जयजयकार ने दुमदुमली होती दररोज दुपारी 02 वाजता हनुमान गढी येथे लालकृष्ण अडवाणी, स्व.अटल बिहारी वाजपेयी, आचार्य धर्मेद्र जी महाराज, अशोकजी सिंघल, साध्वी ऋतुभरा देवी यांची श्रीराम जन्मभूमी मुक्ती साठी तयार रहावे यासाठी जोश पूर्ण मार्गदर्शन पर भाषणे होत होती 06 डिसेंबर 1992 रोजी सकाळी 06 वाजता श्रीराम जन्मभूमी वर प्रतिकात्मक कारसेवा करावी अशी सूचना मिळाली पण कारसेवकांच्या मनात प्रचंड राग होता प्रांत रचने नुसार सर्व कारसेवक वादग्रस्त बाबरी स्थळा जवळ एकत्रित झाले आणि प्रचंड घोषणा सुरु झाल्या बघता बघता सकाळी 10 ते सायंकाळी 05 यावेळेत वादग्रस्त बाबरी ढाच्याला कारसेवकांनी उध्वस्त केले व त्या ठिकाणी श्रीरामलल्ला चे छोटे मंदिर उभारले सम्पूर्ण अयोध्या नगरी मध्ये त्याच दिवशी दीपावली साजरी झाली सर्व रस्ते गुलाल ने भरले होते सायंकाळी सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्यात आला या ऐतिहासिक क्षणाचे मनमाड चे कारसेवक प्रत्यक्ष साक्षीदार झाले सन 1986 पासून 2024 पर्यंत सलग 38 वर्षे (कोरोना काळात 2020 /2021 मध्ये रथ यात्रा मिरवणूक निघाली नाही ) ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती शहरातील सर्व हिंदूत्ववादी पक्ष संघटना व,संस्थाविविध धार्मिक मंडळे व हिंदू नागरिकांना एकत्र करुन मनमाड शहरातील प्राचीन श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे श्रीराम जन्मोत्सव व भव्य श्रीराम रथयात्रेचे आयोजन करीत आहे. या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सातत्याने अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या संदर्भात विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच मिरवणुकीमध्ये देखावे करुन या आंदोलनाविषयी पत्रकाद्वारे, बॅनर द्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य केले आहे. 1993 साली श्रीराम जन्मभूमी मुक्ती साठी नवी दिल्ली येथील भारतीय संसद भवना वर निघालेल्या विश्व हिंदू परिषद च्या भव्य मोर्चा मध्ये श्रीराम जन्मोत्सव समिती चे स्वर्गीय प्रभाकर (बाबा )थत्ते नितीन पांडे, निलेश खांदाट यांनी सक्रिय सहभाग नोंदवला 1990,1992,2002 या कारसेवे च्या वेळी श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे रेल्वे ने अयोध्या कडे जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या हजारो कारसेवकांचा मनमाड रेल्वे स्थानकात आदरसत्कार करून त्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती 30 सप्टेंबर 2010 ला इलाहाबाद उच्च न्यायालय च्या लखन्नो खंडपीठाने श्रीराम जन्मोभूमीवर श्रीराम मंदिर च होते असा न्यास च्या बाजूने निकाल दिला त्याच्या मोठा जल्लोष श्रीराम जन्मोत्सव समिती ने महाआरती करून फटाक्यांची आतिशबाजी करून साजरा केला तर 09 नोव्हेंबर 2019 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायलय ने अयोध्या येथे वादग्रस्त बाबरी स्थळी च श्रीराम जन्मभूमी असल्या चा ऐतिहासिक निकाल दिला याचाही महाजल्लोष श्रीराम जन्मोत्सव समिती ने मोठया प्रमाणात साजरा केला, तसेच 05 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे शक्तिशाली पंतप्रधान व कारसेवक आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी वर भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्याचे भूमी पूजन झाले त्याच दिवशी ओम मित्र मंडळाच्या वतीने मनमाड शहरातील सर्व कारसेवकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच जानेवारी 2021 मध्ये श्रीराम मंदिर उभारणी साठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास द्वारे निधी संकलन मध्ये श्रीराम जन्मोत्सव समिती ने सक्रिय सहभाग घेतला, या शिवाय गेल्या पंधरा वर्षा पासून श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे 06डिसेंबर हा हिंदू शौर्य दिन म्हणून महाआरती द्वारे साजरा केला जातो 23 डिसेंबर 2023 ला मनमाड शहरात निघालेल्या श्रीराम जन्मभूमी मंगल अक्षदा कलश यात्रे चे यशस्वी आयोजन समिती ने केले आणि सध्या मनमाड शहरात मंगल अक्षदा वितरण मध्ये ही समिती ने पुढाकार घेतला आहे मनमाड शहरात सातत्याने ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती च्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या, चळवळी च्या कार्यात स्वर्गीय पुष्पदंत बापट, स्वर्गीय ईश्वरभाई पटेल, स्वर्गीय मधुकर वावीकर,स्वर्गीय मधुकर घाणेकर स्वर्गीय वसंतराव मनोहर स्वर्गीय वासंती मनोहर,स्वर्गीय बाळासाहेब गटणे , स्वर्गीय गजानन (बाबा) जोशी,रंगनाथ कीर्तने सोमेश्‍वर बारपांडे, रमाकांत मंत्री, नितीन पांडे, नाना शिंदे,अनिल चांदवडकर,प्रकाश गाडगीळ सर, बाळासाहेब कुलकर्णी, किशोर गुजराथी, शेखर पांगुळ, स्वर्गीय कृष्णा शिंपी, दौलत नंदवाणी, टी. सुभाष विकास काकडे,स्वर्गीय चारुदत्त भावे, कमलाकर सोनवणे, स्वर्गीय सुनील केळकर स्वर्गीय किशोर नावरकर, , गोविंद रसाळ, भिकाजी कुलकर्णी,स्व मंगला पटवर्धन, स्व श्रीमती शोभना सप्रे, सौ वैशाली गोडबोले,शोभना केळकर,चारुशीला फडके (पटवर्धन )राजेंद्र वैजापूरकर, राजेंद्र खैरे, स्वर्गीय पंकज पांडे,स्वर्गीय प्रशांत कुलकर्णी प्रदिप गुजराथी, संजय शेवडे,ओम बाविस्कर, दिपक शिंदे,शांताराम खांडगे,चंद्रकांत परब,सुनिल सानप,किशोर आव्हाड, कैलास भाबड,उमाकांत राय, नारायण फुलवाणी, सुनील माणके, प्रकाश कुलकर्णी, प्रकाश पवार, रोहित कुलकर्णी, संतोष बळीद,स्वर्गीय राजाभाऊ छाजेड,केशवराव पाटोळे, रमेश गवळी, गोपी पुरे,सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, गोपाळ कौराणी, आझाद आव्हाड, भरत छाबडा,कैलास भाबड, नारायण पवार, जयकुमार फुलवाणी, दत्ता बारसे,सनी फसाटे, मनोज जंगम शिवाजी सानप सुनील देशपांडे,अक्षय सानप,योगेश देशपांडे, सूर्यभान वडक्ते, सचिन व्यवहारे अभिषेक भाबड समीर गुंजाळ,निलेश खांदाट,अशोक सानप आदी प्रमुख हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांचे सातत्याने मोलाचे योगदान सहकार्य राहिले आहे. आज गेल्या 38 वर्षापासून मनमाड शहरात श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी व श्रीरामाच्या कार्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात श्रीराम भक्तांनी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानासाठी श्रीराम जन्मोत्सव समिती त्यांची सदैव ऋणी राहील. मनमाड शहरातील सर्व पत्रकार मित्रांनी देखील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्याला निःस्वार्थ आणि प्रामाणिक सदैव प्रसिद्धी दिली समिती त्याचे आदरपूर्वक ऋण व्यक्त करते आम्ही प्रभू रामचंद्राचे वारस आहोत हीच भावना मनात ठेवून कार्य करणार्‍या सर्व श्रीराम भक्तांची सोमवार दिनांक 22जानेवारी 2024 रोजी स्वप्न पूर्ती होत आहे पवित्र अश्या श्रीराम जन्मभूमी वर अति भव्य मंदिर निर्माण झाले आहे आणि 496 वर्षा नंतर श्रीराम आपले जन्म स्थानी विराजमान होत आहेत हा ऐतिहासिक क्षण दीपावली स्वरूपात साजरा करणे साठी सर्व श्रीराम भक्तांनी कटीबध्द व्हावे.श्रीराम जन्मभूमी मुक्ती साठीआपले प्राण अर्पण करणाऱ्या लाखो कारसेवकां या प्रसंगी ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि कोटी कोटी नमन

नितीन पांडे (1990 आणि 1992 साली अयोध्या येथे झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनातील सक्रिय कारसेवक तथा संस्थापक सदस्य ओम मित्र मंडळ,संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड)


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.