loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कुलमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Jan 26, 2024

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कुलमध्ये २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळेचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सौ. रुथ इंगल्स यांनी बायबल वाचन व प्रार्थना सादर केली. त्यानंतर देशभक्तिपर गीतांनी आसमंत दुमदुमून गेला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताकाचे महत्व आपल्या भाषणातुन सांगितले. देशभक्ति गीते व भरतनाट्यम् गीतावर शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले. *शाळेतील प्री प्रायमरी गटातील विद्यार्थ्यानी देशातील ज्या महापुरुषांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांची वेषभूषा साकारुन महापुरुषांविषयी मनोगत सादर केले. याप्रसंगी पालक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांनी भारत ही महान शुरविरांची भूमी आहे हे सांगितले. अनेक परकीय आक्रमण या देशावर झाली परंतु ते या देशाला रोखु शकले नाही, कारण हा देश महान पुरुषांच्या ज्ञानाने आणि संस्कृतिने घडलेला आहे असे याप्रसंगी वर्णन केले. देशाच्या स्वातंत्र्यात ज्यां सैनिकांनी योगदान दिले ते स्पष्ट केले.* कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज देशपांडे सर, परविंदर लकी सर, पराग पाखले सर, सौ. कल्याणी सुतार यांनी मोलाचे योगदान दिले. आभार प्रदर्शन प्राचार्य क्लेमेंट नायडू यांनी केले.
सुत्रसंचलन सौ. पुनम बनसोडे, व शाळेच्या विद्यार्थिनीं कु. दर्शनी गायकवाड व कु. मंतशा सय्यद यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.