loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 27, 2024


मनमाड:येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी महाराष्ट्र बँक मनमाड शाखेचे बँक मॅनेजर माननीय श्री. मोहम्मद जाबीर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.याप्रसंगी उप शाखाधिकारी(महाराष्ट्र बँक) श्री.जामिल साहेब, शाळेचे मा. मुख्याध्यापक फादर मॅल्कम ,पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना ,फादर लॉईड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना निकाळे मॅडम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. मुकुंद झाल्टे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या श्री. मोहम्मद जाबीर व जामील साहेब व इतर मान्यवरांचा सत्कार मा. मुख्याध्यापक फा.मॅल्कम
व पर्यवेक्षिका सि.ज्योत्स्ना यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. सुधाकर कातकडे, श्री.दत्तू जाधव व श्री .स्वप्नील बाकळे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गटाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलनाद्वारे उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. मा.जाबीर सरांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना भरपूर शिकण्याचा आणि देशसेवा करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगेश्वरी धोंडगे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.वासंती देवरे मॅडम यांनी केले . सौ. अंजलीना झेवियर, सौ. लीना जाधव सौ.सरस्वती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत. तर श्री.अशोक गायकवाड सर,सौ. झेवियर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायन ग्रुपने देशभक्तीपर गीते सादर केली. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री. प्रकाश नान्नोर सरांनी करून दिली. ‌.कु.निकीता सोनवणे हिने आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कु. हर्षदा कांबळे हिने कॉपीमुक्त अभियानांतर्गत शपथ दिली. त्याचप्रमाणे लोकशाही पद्धतीने नुकत्याच निवड झालेल्या शाळा नायक व शाळा नायिका , क्रीडा नायक व क्रीडा नायिका, गटप्रमुख -उपगटप्रमुख विद्यार्थी प्रमुखांना त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली. या शपथ ग्रहण समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लीना मॅडम, श्री.नवनाथ घुगे सर व श्री. बाकळे सर यांनी केले. मा. मुख्याध्यापकांनी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या पदाची शपथ दिली व जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.