loader image

मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे, महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.

Jan 28, 2024




उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित, मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन कार्यक्रम सांगावी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रशांत (चंदू दादा) देवरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी उद्याच्या विकसित भारताच्या जडणघडणीत तरुण विद्यार्थी वर्गाची मोलाची भूमिका आहे. त्याकरिता विद्यार्थी वर्गाने शिक्षणाबरोबर वेगवेगळे कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविंद्र आहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की,या श्रमसंस्कार शिबिरातून आपणास सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण, स्वावलंबन या बाबीची जाणीव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.खैरनार के.के. यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कु. गवळी ए.के. व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक डॉ.अहिरे एस.डी. यांनी केले. यावेळी सांगवी गावातील ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.