मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.वाजता महाविद्यालयामध्ये करण्यात आलेले आहे सदर कार्यशाळेसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त माननीय डॉ. श्रीमती संपदा दीदी हिरे या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच सदर कार्यशाळेसाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून सिम्बॉयसिस विद्यापीठ पुणे येथील प्राध्यापिका हेमांगी कडलक, लासलगाव महाविद्यालयातील डॉ. सोमनाथ आरोटे व एम. एस.जी. महविद्यालय मालेगाव येथील डॉ. सतीश अहिरे आणि महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.शशी हिरे हे याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम सर यांनी केले.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....