loader image

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

Jan 29, 2024


श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थिती राहून शेतकरी बांधवांना संबोधित केले.
तसेच कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेऊन या प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले.यावेळी राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचांना समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आबासाहेब मोरे, दत्ताजी काकडे ,राजाराम पोतनीस, जे डी टेमगिरे, राजमल भागवत, बाळासाहेब धुमाळ,नरेंद्र जाधव, योगेश तिडके, तानाजी गायकर, सुषमाताई देसले, समाधान बोडके ,सदानंद नवले विविध जिल्ह्यातील सरपंच,शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.