नांदगांव : मारुती जगधने नांदगाव आणी मालेगाव दोन्ही शहराना गिरणा धरणातुन पाणी पुरवठा होतो मालेगाव शहराची २५ लाख लोक संख्या असताना तेथे नियमित पाणी पुरवठा होतो पण नांदगाव शहारची लोकसंख्या सुमारे ४० हजार असताना येथे नेहमीच पाण्याची ओरड असते. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजना अभावी नांदगाव कराना नेहमी पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दि २९ रोजी दत्तनगर,खांदेशीवाडा ,या भागाला २५ दिवसात पाणी पुरवठा झाला नाही संतप्त महिलांनी अचानक रस्त्यावर येऊन नांदगांव मालेगांव रोडवर हंडे घेऊन पाण्याची मागणी करीत रास्तारोको केला. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली पालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने आश्वासन दिल्या नंतर महिलांनी रास्तारोको मागे घेतला .सध्या शहरातिल रहिवाशांना विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे शिवाय इतरञ देखील पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शहराला गिरणा व माणीकपुंज या दोन धरणातुन पाणी पुरवठा होतो या धरनात मुबलक पाणी साठा असताना देखील प्रशासनाच्या नियोना अभावी नागरी भागांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते हे प्रशासनाचे अपयश म्हणचे काय? मागील काही दिवसापूर्वी कैलास नगर वासीयांना पाण्यासाठी रास्तारोको करावा लागला होता सध्या शहरात पाणी टंचाईने डोके वर काढले असून प्रशासनाने जनतेच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नी दुर्लक्ष न करता अग्रक्रमाणे प्राधान्य द्यावे. अशी मागणी होत आहे .

