महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट अभियाना अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.पी.जे आंबेकर यांनी स्कूल कनेक्ट अभियानाची उद्दिष्टे विद्यार्थी व प्राध्यापकां समोर स्पष्ट केली.तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अभ्यासक्रमात लवचिकता, शाश्वत विकास, बहुविद्याशाखीय शिक्षण व भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच या धोरणातील बारकावे पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून विद्यार्थी व प्राध्यापकांच्या लक्षात आणून दिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध सर्वांसमोर स्पष्ट केला व भारतीय शिक्षणाची परंपरा विद्यार्थी व प्राध्यापकांसमोर स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. मिलिंद आहिरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जी.एल शेंडगे यांनी करून दिला या कार्यशाळेप्रसंगी मनमाड शहर व परिसरातील माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी एस देसले कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रोहित शिंदे सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉक्टर गणेश गांगुर्डे तर आभार प्रदर्शन कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फंड यांनी मानले.

राशी भविष्य : ३० एप्रिल २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...