Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ : नांदगाव पोलिसांची धडक कारवाई – दुचाकीचोर तरुण गजाआड

Jan 31, 2024


नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहरात गत सहा महिण्या पासून दुचाकी चोरीला जाण्याचा शिलशिला सुरु होता दुचाकी चोरीचे पोलीसांना जणू आव्हाणच होते त्याच दरम्यान नांदगाव चे रहिवासी
सागर शांतीलाल कायस्थ यांची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद नांदगाव पोलिसात दाखल झाल्यावर
वरिष्ठ पोलीस अधिक्षक शहाजी उमाप,अप्पर पो.अधिक्षक अनिकेत भारती,उपविभागीय पो अधिक्षक सोहेल शेख,यांनी तपास कामी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, यांनी एक पोलीस पथक तयार करुन चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे आव्हाणच स्वीकारले त्याच नजरेतून पोलीस ठिकठिकाणी मीळालेल्या विविध माहीतीवरुन चोरांचा तपास घेत होते एक संशयीत मालेगाव ला एका धार्मीक कार्यात येणार असल्याची खबर नांदगाव पोलीसाना मिळताचा सदर लग्नस्थळी पोलिस थांबुन होती या दरम्यान सकाळ पासून लग्नस्थळी पोलीस थांबुन होते पण लग्न लागले, पंगती उठल्या,वधू सासरी गेली पण पोलीस त्याच ठिकाणी आरोपीच्या शोधात थांबुन होते पण तेव्हा आरोपी तेथे आलाच नाही मग पोलिसांनी पुन्हा तपास चक्रे फिरवत चोरांच्या
मुसक्या आवळण्याचा निर्धार केला .या दरम्यान सदर आरोपी पकडण्यात पोलिसानी यश आले त्यात हि एक आरोपी फरार झाला होता पण पुन्हा पोलीस टिम सावध पविञा घेत तीनही आरोपींना पकडून जेरबंद केले. त्यानी दिलेल्या कबुलीत
नांदगांव ,येवला ग्रा. व शहरातुन मनमाड ,लासलगांव येथून ,म्हसरुळ नाशिक ,अंबड नाशिक येथून
आदी भागातुन चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या बाकी दुचाकी ज्या त्या शहर गावे येथे पोलीस स्टेशनवर ठेवण्यात आल्या जेनेकरुन नागरीकाना त्या ठिकाणी उपलब्ध होतील. या कामी पो नि प्रितम चौधरी,सा पो नि नितीन खडांगळे,पो उ नि मनोज वाघमारे,पो उ नि संतोश बहाकर,पो ह विनायक जगताप,धर्मराज अलगट,भारत कांदळकर,पो ना मुद्दसर शेख,अनिल शेरेकर,नंदु चव्हाण,दत्तु सोनवने,दिपक मुंढे,सागर बोरसे,परदेशी,साईनाथ आहिरे आदीनी मिशन पूर्ण केले.या संदर्भात अप्पर पो
.अधिक्षक अनिकेत भारती यांनी पञकार परिषदेत सदर माहिती सादर केली असून नागरीकानी वाहन खरेदी करताना कागदपञाची पडताळणी सक्षम अधिकार्याकडुन करुन घ्यावी असे आवाहन केले. व नांदगांव पोलिसांना कामगिरीची शाबासकी दिली. घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहे .आजुन दुचाकी हाती लागण्याची शक्यात पोलिसांनी व्यक्त केली सदरचे संशयीत आरोपी हे १९ ते ३० वयोगटातील असून त्यांनी आनेक दिवसापाऊन दुचाकी चोरीचा सपाटा लावला होता . त्याच्या विरुध्द नांदगांव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]