loader image

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

Feb 3, 2024



उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
शासनाकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य विनियोग करा,दहा पैशाचे वीस पैसे कसे होतील. याचा सारासार विचार करून व्यवसाय करा.आणि आपली आर्थिक प्रगती साधा असे आवाहन आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी तथा समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या तालुकाप्रमुख सौ.विद्या जगताप, शहरप्रमुख रोहिणी मोरे,मनमाड शहर प्रमुख सौ.संगीता बागुल, बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी मनजीत शहारे,प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी,स्वयं सहाय्यता बचत गटाचे अशोक अहिरे (साकोरा प्रभाग),भालूर प्रभाग चे दीपक सोनवणे,न्यायडोंगरी चे राहुल भदाणे,तालुका समन्व्यक अश्विनी जाधव,आदी उपस्थित होते.
सौ.कांदे बोलताना म्हणाल्या की,ज्या जबाबदारीने कर्ज घ्याल,त्या जबाबदारीने फेडले ही पाहिजे जेणेकरून तुमची पुढची प्रगती सुखकारक होईल.तसेच या दृष्काळी तालुक्यातल्या माझ्या माता बैहिनांना त्यांच्या घरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले आमदार सुहास कांदे यांनी व मी एक महत्वकांक्षी योजना आखली आहे.येत्या काही महिन्यात ते काम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत.त्यासाठी दवा अन दुवा ची गरज आहे,तर दवा आम्ही देतो दुवा तुम्ही करा.! असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पहिल्या टप्यात किमान २५ हजार महिलांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.असे त्या शेवटी म्हणाल्या.याप्रसंगी तालुक्यातील गिरणानगर येथील ६ बचत गट तर लोहशिंगवे येथील ५ महिला बचत गटांना बँक ऑफ बडोदा कडून प्रत्येकी १ लाख ५० हजार असे १६ लाख ५० हजार रुपये कर्जाच्या धनादेशाचे वितरण सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.