loader image

शहीद संदीप मोहिते यांचे मांडवड येथे स्मारक उभारणार – आमदार कांदे

Feb 3, 2024


पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची ,देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव रहावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करताना आ.श्री.कांदे पुढे म्हणाले की,आपले भारतीय जवान आपल्या देश बांधवांसाठी, देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळेच आपण आणि आई – बहीण किंवा संपूर्ण कुटुंबं सुरक्षित आहे.
नांदगाव तालुक्याच्या वतीने आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,माजी आ.अँड.अनिल आहेर, आ.संजय पवार,जगन्नाथ धात्रक,विलास आहेर,शिवसेना तालुका प्रमुख शाईनाथ गिडगे, राजेंद्र पवार,किशोर लहाने,सागर हिरे,समाधान पाटील,अंकुश कातकडे,अँड.जयश्री दौंड,राजेश बनकर,गटविकास अधिकारी संदीप दळवी,विठ्ठलं आहेर, आदिंसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.