मनमाड -मी ही जी कामे मनमाड शहरात करत आहे,ते तुमच्या उपकारामुळेच,कारण तुम्ही मला एका डोंगराएवढ्या माणसाच्या विरोधात मते देऊन निवडून आणले आहे.त्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी अखेरपर्यंत या मनमाड चा विकास करत राहणार असे स्प्ष्ट अभिवचन तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी दिले.
पुढे बोलताना आमदार श्री.कांदे म्हणाले की, काही दिवसापूर्वी तुटलेल्या रेल्वे पुलामुळे या राष्ट्रीय महामार्गांवरील पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.त्याचा प्रचंड त्रास मनमाड सह नांदगाव ला ही होत होता.म्हणून तत्काळ मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चव्हाण यांचेकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये मंजूर करून दिले.आणि सर्वांच्या सहकार्याने जलद गतीने हा पूल पूर्ण झाला.असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी जेष्ठ रिपाई नेते गंगादादा त्रिभुवन मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,मनमाडकरांच्या पदरात भरभरून विकासाचे दान टाकत् आहेत.अण्णा किती करताय…आम्हाला इतक्या विकासाची सवय नाही असे म्हटले याप्रसंगी गालिब शेख,मयूर बोरसे,शाईनाथ गिडगे,आदींनी व्यक्त केले.
व्यासपीठावर अल्ताफबाबा खान,शाईनाथ गिडगे,राजाभाऊ आहिरे,बबलू पाटील,नितीन पांडे,गंगाभाऊ त्रिभुवन,नाना शिंदे,सुनील हांडगे,पोलीस निरीक्षक श्री.लांडगे,मयूर बोरसे,फरहान दादा,गालिब शेख,योगेश इमले,अमजद पठाण,सतीश केदारे,लालाभाऊ नागरे, राकेश ललवाणी,राजाभाऊ पारिख,पिंटू भाऊ वाघ,उमेश ललवाणी,
क्षणचित्रे -: यावेळी प्रचलित पद्धतीसह हा पूल बंद पडल्याने सर्वाधिक त्रास कुणाला झाला,अन तातडीने पुलाचे काम केल्यानंतर या लोकांना किती आनंद झाला.त्या ट्रक ड्रायव्हर, बस वाहक,चालक,टॅक्सी ड्रायव्हर,इंधन वाहतूक करणारे चालकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी व्यासपीठावरून दिली गेली होती.ही वेगळी गोष्ट होय.
-: यावेळी वाहतुकीसाठी पूर्ण सज्ज झालेल्या पुलावर विद्युत रोषणाई,फुलांची सजावट,फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.त्यामुळे एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.






