loader image

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

Feb 6, 2024


मनमाड – येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हिताचे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात .
या वर्षीचे आगळे वेगळे हळदी कुंकू समारंभ
सिध्दी क्लासेसच्या संचालिका सौ भाग्यश्री दराडे व डॉक्टर भागवत दराडे यांनी ४ फेब्रुवारी २०२४ जागतिक कर्क रोग दीन निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता.
या दिवशी क्लासेस तर्फे सौ डॉ. स्वाती शशिकांत कातकडे यांनी कर्क रोगाचे प्रकार,प्रकारानुसार रोगाचे लक्षण,त्यावरील विविध उपचार व भविष्यात कर्क रोग होऊ नये याची काळजी कशी घेणे यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊन आरोग्याचे वेगळे वान दिले,तसेच मुलींना व स्त्रियांसाठी बी आर फिटनेसच्या संचालिका सौ रुपाली भामरे यांच्या झुंबाचे आयोजन करून तणाव मुक्ती साठी झुंबा डान्स चे धडे रुपाली मॅडम यांनी दिले.
याच कार्यक्रम द्वारे घरगुती व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या कामाची ओळख करून देण्यात आली . सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिक महीला ने आनंदाने सहभाग घेऊन 11लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता,यामधे सौ देवकी महेश गायकवाड यांचे पूर्वा ब्युटी पार्लर, ऋतुजा छाजेड यांचे जिनेश केक,सौ सोनाली जंगम यांचे स्वामी बेंटेक्स,सौ अस्मिता जोशी यांचे गौरी ब्युटी पार्लर, सौ शर्मा यांचे अंजेल टेलर्स, सौ पांडे मॅडम यांचे अबेकॅस क्लासेस, दीप्ती भंडारी यांचे गणेश ज्वेलर्स, रसिका पाटणे यांचे स्वामी कॉस्मेटिक , बीडगर ज्वेलर्स उसवड,सौ मकवाने यांचे युगा सारीज तर्फे पैठणी आणि
सिध्दी क्लासेस तर्फे
उखाणे मिमिक्री यासाठी विजेत्यांना सिध्दी क्लासेस ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले तर
कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांचा सत्कार कृष्णा कन्स्ट्रक्शन च्या सौ शुभांगी अनिल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमामध्ये 240 महिलांनी सहभाग नोंदवला .

सौ सोनाली पितृभुक्त यांनी अहिरानितून आपले मत व्यक्त केले व उखाणा सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर ज्ञानराज गणेश थोरे या 6 वर्षांच्या चिमुकल्यांने दमदार आवाजात शिवगर्जना करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
खादगावच्या सरपंच व कार्यक्रमाच्या ज्येष्ठ पाहुण्या संगीता ताई वडक्ते यांनी आपल्या मनोगतात सिध्दी क्लासेस ने आरोग्यदायी माहिती देऊन व एक एक झाड वान म्हणून देऊन समाजासमोर एक नवीन आदर्श घालून दिला असे सांगितले ,तसेच सौ मानसी संदीप देशपांडे ,सौ अम्रपली निलेश वाघ व सौ रेश्मा पगारे यांनी क्लासेस च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी जोशी व सई झालटे यांनी केले तर हळदी कुंकवाचे महत्व अपूर्वा दीवेदी व अर्पिता जगताप यांनी सांगितले
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी क्लासेसच्या 9 वी इयत्तेच्य सर्व विद्यार्थिनींनी तसेच सौ गायत्री अनिल चौधरी,सौ दीपाली ताठे, सौ रेखा महाजन मॅडम ,सौ प्राजक्ता जोशी,सौ अस्मिता जोशी ,सौ गवळी,शिला गंभिरे ,सौ मंगला सुरवाडे ,यांनी सहकार्य केले .
सिध्दी क्लासेस च्या संचालिका सौ भाग्यश्री भागवत दराडे यांनी सर्वांचे आभार मानले.सिध्दी क्लासेस ने आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे सर्व स्थरातील महिलांकडून कौतुक होत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.