मनमाड – मनमाड शहरातील सुमारे साडेसात दशकांपासून शहर आणि पंचक्रोशीतील ग्राहकांचे विश्वास संपादित करणाऱ्या आणि पारदर्शक व्यवहार तसेच 22 कॅरेट 916 HUID दागिन्यांचे कॅरेट प्रमाणे भाव आकारून ग्राहक हित जोपासणाऱ्या मे. कंचन ज्वेलर्स या पेढीतर्फे यंदाही दसरा दिवाळी बंपर धमाका ऑफर आयोजित करण्यात आला होता. या ऑफरचा सोडतीचा कार्यक्रम दिनांक 5 फेब्रुवारी रोजी येथील साई प्रसन्न लॉन्स येथे शेकडो ग्राहकांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. याप्रसंगी कंचन ज्वेलर्स चे संचालक तुषार प्रकाश गोयल आणि दीपक प्रकाश गोयल यांनी ग्राहकांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात कंचन ज्वेलर्स चे संचालक तुषार गोयल यांनी कंचन ज्वेलर्स च्या यशस्वी वाटचालीत सन्माननीय ग्राहकांचे मिळालेले पाठबळ आणि शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणाऱ्या कंचन ज्वेलर्स च्या वाटचालीचा आलेख आपल्या प्रास्ताविकात नमूद करत ग्राहकांनी बंपर ऑफरला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानले व भविष्यातही अशाच प्रकारचा पाठबळ आणि विश्वास कायम राहू द्या असे आवाहन केले.या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्राहकांसोबत आलेल्या बच्चे कंपनी च्या हस्ते सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला . या सोडत कार्यक्रमाला श्रीमती कलावती प्रकाश गोयल, सौ. मोहिनी जगदीश गोयल, सौ.लीना गोपाल गोयल, सौ.पूनम दीपक गोयल यांच्या शुभ हस्ते प्रमुख बक्षिसांची सोडत काढण्यात आली. या कार्यक्रमाला नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अमोल खरे, झी 24 तास चे प्रतिनिधी निलेश वाघ, गावकरीचे पत्रकार नरहरी उंबरे, लोकमत चे प्रतिनिधी अशोक बिद्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद बोथरा यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्विततेसाठी पद्माकर पगारे, तुषार आव्हाड, आनंद बोथरा यांनी विशेष परिश्रम घेतले.








