loader image
[ays_poll id=7]

के आर टी मध्ये गॅस सुरक्षा मेळावा संपन्न

Feb 9, 2024


8 फेब्रुवारी 24 रोजी के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये गॅस सुरक्षा मेळावा घेण्यात आला.आपल्या रोजच्या जीवनात घरगुती गॅस हा वापरला जातोय याचा योग्य रीतीने वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले. मेळाव्याचे आयोजक हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस सेंटर मनमाड यांनी केले. एच पी गॅसला 50 वर्षे पूर्ण झाली.एच पी गॅसचे डीलरशिप असलेले राजेश पारिख,शुभांगी शर्मा,मनोज गरुड व शहाबाज सय्यद यांचे स्वागत व सत्कार शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.घरगुती गॅस कसा वापरावा,पेट्रोलियमचा शोध कसा लागला. बरीच माहिती दिली. एल पी जी गॅस चा घातकपणा कसा दूर करावा. याचीही माहिती देण्यात आली. गॅसच्या भरलेल्या टाकीचे वजन 14.2 kg व रिकाम्या टाकीचे वजन 15.9 kg एवढे असते. एलपीजी सिलेंडरची निर्मिती कशी व कुठून झाली.हिंदुस्तान पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती केर- रॉक यांनी केली.केरोसीन. डिझेल पेट्रोल आणि 116 बाय प्रोडक्ट पेट्रोलियम पदार्थांमध्ये मोडतात. या गॅस सिलेंडर मध्ये प्रोटेन आणि ब्युटेन चे मिश्रण असून(-) डिग्री टेंपरेचर मध्ये कोम्पेक्ट करून त्यात भरला जातो. यालाच एलपीजी असे म्हणतात याचे पूर्ण नाव लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस आहे.एलपीजी गॅस याला रंग नाही. रूप नाही. ते हवेपेक्षा जड आणि पाण्यापेक्षा हलका आहे. म्हणून तो पाण्यावरती तरंगतो आणि पेटतो. त्यामुळे एलपीजी गॅस ची आग ही पाण्याने भिजत नाही. एलपीजी सिलेंडर मध्ये प्रोपेन 35 टक्के आणि ब्युटेन 65 टक्के मिश्रण असते.याला सुगंध नसल्यामुळे याचा उग्रवास येण्याकरिता त्यामध्ये इथे मेरेटेन नावाचा पदार्थ टाकला जातो. सिलेंडर हा व्हर्टिकल पोझिशन मध्ये बनविला आहे. याचे कारण असे की एलपीजी गॅस हवेपेक्षा जड असल्याने तो खाली बसतोय एलपीजी हा गॅस 1थेंबाने 265 पटीने तयार होतो.सिलेंडरचे वजन.एक्सपायरी डेट.हेल्पलाइन नंबर.0 रिंग रेग्युलेटर ची माहिती. रबर ट्यूब ची माहिती. शेगडी पासून तर सिलेंडर पर्यंत रबर ट्यूबही 1.5 मीटर पुरते. त्यामुळे कंपनीने रबर ट्यूबशी 1.5 मीटर चे बनवलेले आहे. रबर ट्यूब सुरक्षा ही दर 5 वर्षांनी बदलावी. आधार कार्ड गॅस कनेक्शन ला लिंक करण्यासाठी kycकरणे गरजेचे असते. स्वयंपाक करतेवेळी सगळी स्वयंपाकाला लागणारी सामग्री सोबत घेऊन ठेवायची.नेहमी प्रेशर कुकर चा उपयोग वापर करावा. नेहमी सर्वांनी मिळून सोबत जेवण करावे. म्हणजे तो स्वयंपाक वारंवार गरम करावा लागणार नाही.यामुळे गॅसची बचत होते. आणि कुटुंबात प्रेमही वाढेल. आजच्या मेळाव्यात इयत्ता 8वी 9वी, 11वीच्या मुलांनी सहभाग घेतलेला होता.मुलांना काही प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली. आणि उत्तरे दिलेल्या विद्यार्थ्यांना लाईटर बक्षीस देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांसाठी पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.