loader image
[ays_poll id=7]

जरांगे पाटलांची तब्बल १५ तास प्रतिक्षा मध्यराञी ३ वा जंगी स्वागत

Feb 9, 2024

नांदगाव : मारुती जगधने दि ८ रोजी सकाळी ११ वाजे पासून नांदगांव येथे सकल मराठा समाज जरांगे पाटलांची वाट बघत होते दुसर्या दिवशी दि ९ जानेवारी पहाटे ३ वा पाटीलांचे नांदगावी आगमन होताच त्यांचे अहिंसा चौकात जंगी स्वागत करण्यात आले .

नांदगाव शहरातील श्रीरामनगर हद्दीत अहिंसा चौकात मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत झाले या दरम्यान जंबो फुलांचा हार क्रेनला लावण्यात येऊन पाटलांचे अभिनंदन केले या प्रसंगी प्रथम छञपतीं शिवाजी राजे यांच्या पुतळ्याला हार घालुन नंतर पाटालांनी सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार स्वीकारला.यावेळी मध्यराञीचे ३ वाजले होते पाटील यांनी समाजाला धिर धरा संयम राखा हक्काचे आरक्षण मिळेलच असा युक्तीवाद करीत उपस्थीतांची मने जिंकली .
यावेळी आनेक जेसीबीच्या मदतीने उंचावरून फुले उधळत पाटलांचे जंगी स्वागत केले .चार वाजे नंतर ते पुढे मार्गक्रमण झाले.
जरांगे पाटील येण्यापूर्वी
दादासाहेब पुंडलिक काळे यांचे हृदयविकाराणे निधन झाले ते मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताच्या तयारीत नाचले कुदले त्यात त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला आणी त्यांचे निधन झाले त्यांची जरांगे पाटलांची भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली.
दरम्यान जरांगे पाटिल यांनी काळे कुटुंबीयाना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी हजारो सकलमराठा समाजातील लोक स्वाग:ताला उपस्थित होते. तब्बल १५ तासाच्या प्रदिर्घ प्रतिक्षे नंतर जरांगे पाटील हे नांदगांव नगरीत दाखल झाले होते .

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.