loader image

२५ हजाराची लाच घेणारा ग्रामसेवक ए सी बी च्या जाळ्यात

Feb 10, 2024


नाशिक – बांधकाम ठेकेदाराकडून उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता तळेगाव (अं) येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शांताराम शिंपी २५ हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे मुलास तळेगाव (अं) येथील स्मशान भूमी संबंधी कामकाजाकरिता ९ लााख ९६ हजार ५३८ रुपयाचे कामकाज ग्रामपंचायत तळेगाव (अं) येथून मिळाले होते. त्यापैकी शासकीय फी कापून रुपये ७ लाख ४७ हजार ७०० रुपये त्यांच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता लोकसेवक यांनी दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशस्वी सापळा अहवाल
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष वय- 58
आरोपी ज्ञानेश्वर शांताराम शिंपी,वय 42वर्षे , धंदा – नोकरी , ग्रामसेवक, सजा तळेगांव (अं), ता. जि.नाशिक
*लाचेची मागणी 25000/
*लाच स्विकारली – 25000/
*लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -09/2/2024
*लाचेचे कारण* -.तक्रारदार यांचे मुलास तळेगांव (अं) येथील स्मशान भूमी संबंधी कामकाजाकरिता 996538 रुपयाचे कामकाज ग्रामपंचायत तळेगांव (अं) येथून मिळाले होते. त्यापैकी शासकीय फी कापून रुपये 7,47,700 रुपये त्यांच्या मुलास मिळाले होते. उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून, सदरची रक्कम अदा करण्याकरिता लोकसेवक यांनी दिनांक 9/2/2024 रोजी तक्रारदार यांचेकडे 25000 रुपये लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून
त्रबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी:- परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. नाशिक
*सापळा पथक – पोहवा प्रफुल्ल माळी ,पोना/ विलास निकम


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.