loader image
[ays_poll id=7]

मराठायोद्धा मनोज जरांगेंचे पुन्हा “उपोषणास्त्र”                 

Feb 11, 2024

मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील अंतरवली-सराटी येथे त्यांनी उपोषण सुरु केले असून याच ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केलय. राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलय.विशेष अधिवेशन बोलवा. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय, तो स्वीकारुन तुम्ही कायद्यात रुपांतर करा” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. “अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत. मी उपोषण मागे घेतलं, त्यावेळी गुन्हे मागे घेण्याच तुम्ही आश्वासन दिलं होतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आमच्यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतले, सरकारच्या मनात असेल तर काहीपण होऊ शकतं” असं ते म्हणाले. “शरीर साथ देतं, नाही देतं यापेक्षा माझा समाज मोठा आहे. एकाजीवाची किंमत करण्यापेक्षा करोडो जीवांची किंमत सरकारला करावी लागेल. एक जीव गेला तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणालेसरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलीय, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. उपचार, पाणी अन्न काही घेणार नाही. मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनात सुरुवातीपासून सक्रीय सहभाग देणारे नांदगाव तालुक्यातील त्यांचे समर्थक भास्कर झालटे, भिमराज लोखंडे, विष्णू चव्हान, वडघुले आदींसह मराठा समाजातील बांधवांनी नांदगाव येथे उपोषणाला सुरुवात केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.