नांदगाव -: महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नसतानाही जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गांवरील (एन एच ७५३ जे) टोल वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासह टोल बंद करण्याचे निवेदन देताच टोल प्रशासनाने सदर महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूल करणार नसल्याचे जाहीर केले.
टोल व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर जळगाव ते चांदवड संपूर्ण मार्ग सिमेंटचा बनवण्यात आला.मात्र अजूनही महामार्गांवर ज्या सुविधा वाहनचालकांना उपलब्ध केल्या जातात,त्याची मात्र अजूनही पूर्तता करण्यात आलेली नाही.त्यात प्रथमोपचार,शौचालय,बाथरूम,आराम गृह,रुग्णवाहीका, क्रेन हवा भरण्यासाठी यंत्र,यासह अनेक सुविधांचा वानवा दिसून येत असल्याचे दिसून आल्याने सदर टोलनाका तात्काळ बंद करावा असे निवेदन दिले.
युवा सेनेची ही मागणी टोल प्रशासनाने मान्य करत टोल वसुली थांबवून टोल पूर्ण सुविधा दिल्यानंतरच सुरु केला जाईल.असे जाहीर केले.यावेळी राजेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर कांदे, तालुका सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे,शहरप्रमुख सुनील जाधव,अय्याज शेख,महेंद्र गायकवाड,बापू जाधव,भावराव बागुल,भैय्या पगार,सचिन पगार,शशी सोनवणे,नितीन सोनवणे,गणेश हातेकर,गौरव बोरसे,अमान खान, मनमाड शहर प्रमुख योगेश इमले,उपाध्यक्ष मन्नू शेख, माजी नगरसेवक आझाद पठाण,गणेश कुमावत,रोशन बोरसे,प्रीतम पवार,बाळा काकळीज, मनिष बागोरे,वाल्मिक निकम,सचिन उदावंत, संदीप मवाळ,प्रथमेश बोरसे,अविनाश लुटे, जीवन भाबड, आबा बोरसे,चेतन बोरसे,पवन झाडगे,गोपी मोरे,गोकुळ मोरे,विकी बोरसे,सोनू इप्पर,दिपक, गणेश पवार,जीवन भाबड, आदिंसह शेकडो युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...