आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी रोजी पूर्णकृती पुतळा लोकार्पण झाला हा सोहळा यशस्वी करण्याकरिता यथोचित योगदानाबद्दल व आभार व्यक्त करण्याकरिता मनमाड शहरातील बौद्ध विधी उपासक यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान आज आमदार कार्यालय येथे करण्यात आला.
या प्रसंगी आमदार साहेबांच्या हातून घडलेले कार्य महान आहे आम्ही कधी अशी अपेक्षा केली नव्हती असा सोहळा त्यांनी करून दाखवला , बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक हे समाजाला प्रेरणा देईल आणि आण्णांनी केलेल्या या कार्यामुळे समाज सदैव त्यांचे धन्यवाद देत राहील असे मत उपस्थितांनी व्यक्त केले
या प्रसंगी राजाभाऊ पगारे, फरहान(दादा) खान, गंगाधर त्रिभुवन, मयूर बोरसे यांनी प्रस्ताविक केले, डी एस म्हस्के, सुरेशजी अहिरे, एम डी पगारे, भागवतराव गांगुर्डे, विलास अहिरे, लक्ष्मण दिवार, सुभाष अहिरे, अर्जुन साळवे गीत गायन व मनोगत व्यक्त केले.तसेच अशोक गरुड, पोपत शिरसाट, अनिल शेजवळ, संदीप घोडके, कैलास शिंदे महेंद्र गरुड विलास शिंदे जीवन पगारे दयानंद घोडके बौद्ध विधी उपासक यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
या वेळी राजाभाऊ अहिरे, अल्ताफ बाबा खान, सुनील हांडगे, सचिन सांगवी, बबलू पाटील, योगेश इमले, मिलिंद उबाळे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, जयेश सहस्रबुद्धे, गांगुर्डे काका,मनू शेख, बापू वाघ यांनी सूत्रसंचालन, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे तसेच शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.



