loader image

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

Feb 17, 2024



नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे साध्य होईल आपल्या सुप्तगुणांना वाव द्या.तसे
तारुण्यात आनेक फाटे फुटतात ते बाजूला करून जीवन जगायचे आहे .तरुणांनी निराश न होता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे असा संदेश कवी काशिनाथ गवळी यांनी  दिला ते नांदगाव महाविद्यालयायील गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हूणुन संवाद करीत होते.
कवि गवळी यांनी सादर केलेल्या गजल आणी कविता मध्ये
काळजावरी चरे पाडते तिच्यासारखी दुसरी बोचरी करवत नाही. तुझ्या वाचुनी मला करमत नाही. जरी  तीची चर्चा पुन्हा  ओठात नाही मग पुन्हा त्या गावात जायचे नाही. ठेवला विश्वास ज्यांनी काय कारण द्यायचे मी वासरांना माय त्यांची कळपात नाही.
प्रेम नाही सांगतो पण चेहरा किती लाजतो.
उभे नासले पाण्यात देवा जरा ही ना तोटा आता आसवांचा ,चरे पाडते बातमी काळजाला .तुला पाहणे टाळले एकादा अन…गुन्हेगार झालो तुझ्या पापण्यांचा ,सखे बोलना आंतरिक काय आहे .उगाच तोंडमारा नको भावनांचा ,कुणाकुणाशी लढु लढाई जिथे तिथे भेटती कसाई.
घोळक्यात पाहुनी ती अप्सरा दिसायची .चेतुन जागून ती निघून जायची. अवघड जरी खेळ हरनारा नाही डाव कधी सोडनार नाही .
ही राञ चांदण्याची जाणून घे जरा तु वचने जुनी दिलेली. यासह  विविध गजलांनी उपस्थीतांची मने जिंकून घेत कवि गवळी यांनी चौफेर गजलांच्या शब्दांची उधळण केली .कवि गवळी यांनी
१३ गजल साहित्ये, गजलेचा  प्रसार आणी प्रचारसाठी
काम हाती घेतले ते गझल मुशायरी समितीचे अध्यक्ष आहेत या प्रसंगी मविप्रचे संचालक  संदीप गुळवे, अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी प्राचार्य शिंदे ,उप प्राचार्य एस एन मराठे ,संजय आहेर,विजय चोपडा,प्रा. देवरे,काकळीज,प्रभाकर काकळीज, प्रा नारायने,सुरेश शेळके ,सचिन बैरागी  यांचेसह प्राध्यापक  कर्मचारी व विद्यार्थी र्व मविप्र सभासद व विविध क्षेञातील नामवंत   मोठ्या संख्येने हजर होते. या वेळी शेकडो गुणवंतांचा  प्रशस्ती देऊन सन्मान करण्यात आला .


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.