loader image

डाॅक्टरवाडी बाभुळवाडी घरकुल,विहीर लाभार्थी व पाणी योजनेची चौकशीची मागणी

Feb 17, 2024



नांदगाव : मारुती जगधने
तालुक्यातील डाॅक्टरवाडी,बाभुळवाडी ग्रांमपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना मध्ये
विहिर व घरकुल मंजूर करताना मुख्य गरजू व गरीब लाभार्थींना डावलण्यात  आले .या पूर्वी लाभ मिळालेल्या ना देखील यादीत पुन्हा घेण्यात आले .त्यामुळे घरकुल व रोहयो विहीर योजनेत बोगस लाभार्थींचा समावेश असल्याचा आरोप सामाजीक कार्यकर्ते संजय मेंधे  पाटील यांनी केला त्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी नांदगाव यांना त्यास्वरुपाचे निवेदन सादर केले. असून या संदर्भातील खऱ्या व बोगस लाभार्थी यांची सखोल चौकशी करुन गरजू व मुळ लाभार्थींना न्याय देण्याची मागणी केली आहे तसेच गावसाठी राबविलेल्या पाणी योजनेचा गावाला व नागरीकाना पाण्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे नागरिकांना, महिलांना पाण्यासाठी विहिर, बावडी शोधून पाणी आणावे लागत आहे विहीर योजनेची देखील चौकशी करण्याची मागणी मेंधे पाटील  यांनी केली आहे .विहिरीला पाणी असताना ते पाणी गावासाठी मिळत नाही पाण्याचा खाजगी वापर होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.