भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लि.ला (पीपीबीएल) व्यवहार थांबविण्यासाठी दिलेली मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली आहे. या आधी बँकेला २९ फेब्रुवारीपासून कोणत्याही ग्राहकांची खाती, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. व्यापारी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नियम उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई केली होती.
