Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Feb 17, 2024


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. रेणुका आजी भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सुभाष निकम  यांनी आजींच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. यशस्वी पुरुषामागे स्त्रीचाच हात असतो याप्रमाणे कै. रेणुका आजींनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना संपूर्ण जीवनभर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात भरभक्कम अशी साथ दिली. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. गणेश गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतातून स्व रेणुका आजी हिरे यांचा जीवनपट उलगडत असताना  प्रारंभीच्या काळापासून तर शेवटपर्यंतच्या आजींच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.  या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी. के. बच्छाव,
पर्यवेक्षक व्ही. आर. फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप ढमाले यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]