*!!शिवजन्मोउत्सव 2024!!*
मनमाड शहरातील सकल मराठा समाज तर्फे या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात जास्तीत जास्त मनमाड करांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता यायचं नाही. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतं. रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा घटक वाया जाईल असं काहींना वाटतं. पण तसं नाहीय. रक्तदानानंतर काही तासांतच आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्तदानातून उत्तम समाजसेवा करता येते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहेत तरी सर्व शिवभक्त नीं रक्तदान करून सहकार्य करावे
*एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बना*
*सकल मराठा समाज. मनमाड आयोजित रक्तदान शिबिर उद्या रविवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत*
*ठिकाण :- छत्रपती शिवाजी महाराज चौक.*

मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे...