loader image

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

Feb 17, 2024


नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
      कार्यक्रम स्थळी आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करत सौ.कांदे यांचे स्वागत करण्यात आले.
      या कामासाठी आधी मंजूर निधी  ८० लाखांवरून आता १ कोटी झाला आहे. त्यामुळे पुलाचे काम दर्जेदार होईल यात काही शंका नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या ठिकाणी यापूर्वीलोकवर्गणीतून प्रा.नारायणे यांनी एक छोटा पूल बांधला आहे. त्याला गमतीने नारायण सेतू म्हटले जायचे म्हणून या पुलाला ही नारायण सेतू हेच नाव देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
       मनमाड व नांदगाव मधील माझ्या माता भगिनींसाठी पाण्याची प्रमुख समस्या होती ती आता सुटल्यात जमा आहे. करंजवण व  गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजनांचे कार्य अतिशय जलद गतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
     तुम्ही अण्णांना आशीर्वाद देऊन तुमचा कुटुंबप्रमुख होण्याची संधी दिली.त्याचा त्यांना अभिमान असून,प्रत्येक क्षणाला ते तालुक्यासाठी काय -काय नवीन करता येईल आणि दुष्काळी असा शिक्का पुसण्यासाठी काय करायला हवे असा विचार करत असतात.म्हणूनच मनमाड ला एमआयडीसी,नांदगाव ,मनमाड मधील महिलांसाठी घरपोच उद्योग निर्मिती ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    या प्रसंगी मंचावर  शिवसेनेच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल,नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे,  नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, माजी नगरसेवक नंदू पाटील, माजी सरपंच सौ मंगला नावंदर, ॲड. सचिन साळवे, प्रकाश आहेर सर उपस्थित होते.
      या कार्यक्रमास हनुमान नगर व लक्ष्मी नगर परिसरातील नागरिक महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शीला दैतकर, रत्नमाला गायकवाड, अनिता निकम,सोनाली सोनजे,संगीता बागोरे, ललिता सोनवणे, पुनम माने, सुनंदा घुले, पगार मावशी, थोरात मावशी, दिपाली घुगे,मंगला चव्हाण, कटारे ताई, चव्हाण बाई, सरला पाटील, ज्योती पगार, मंगला गरुड, लिलाबाई गोराडे, पूनम पाटील, प्रियंका पाटील, नीलिमा घोडके, भारती घोडके, मेघा वाघ, आदींसह
शिवसेना महिला आघाडीच्या तब्बसुम सैयद, रेणुका बाहीकर,निशा चव्हाण, कल्पना बोळीज,मायाताई शेळके, सुरेखा सानप,सरला निकम, वैशाली मोरे, संगीता निकम, गीता शिंदे, नम्रता सांबरे, राधा सांबरे, रेखा छत्रे,जानवी शर्मा, सोनिया सोर, नीता दराडे आदी उपस्थित होते.

राजेंद्र मोरे सर यांनी प्रास्ताविक तर
ॲड.सचिन साळवे यांनी सूत्रसंचालन केले

परसराम शेळके सर सचिन आहेर गुलाब पाटील सर उमेश सरोदे राजेंद्र कुटे संतोष शर्मा ळे सर शिवाजी गरुड कापडणे सहर्ष शशिकांत पगार हितेंद्र आहेर जगन्नाथ गोराडे प्रकाश रासकर विजू बागोरे मंगल गरुड घुले सर अजिंक्य पाटील निकम सर निकम सर शुभम सरोदे आदी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.