मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे सगेसोयरे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी नांदगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनास आज रविवारी 9 दिवस पूर्ण होत आहे दरम्यान आमरण उपोषण करते यांची प्रकृती चिंताजनक झाली असून दोन्ही उपोषणकर्त्यांची शुगर लेवल कमी झाल्याने दोघांनाही चक्कर येत असून भास्कर झाल्टे यांचा रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट होण्यास सांगितले असता दोन्ही उपोषणकर्त्यांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या 09 दिवसांपासून सातत्याने ग्रामीण भागातील विविध गावकरी भजनी मंडळांनी उपोषण स्थळी रोज रात्री 09 ते 12 पर्यंत भजनाच्या माध्यमातून आंदोलनास बळ दिले आहे यात साकोरे, परधडी,जळगाव खुर्द, बाणगाव बुद्रुक आणि नांदगाव शहरातील हमालवाड्यातील जय बाबाजी भजनी मंडळाचा प्रमुख सहभाग होता नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजवंत मराठा तरुणांचा या आंदोलनातील सक्रिय सहभाग हा लक्षणीय ठरला आहे महाराष्ट्र बंद मध्ये सुद्धा नांदगाव व मनमाड शहराने 100% बंद यशस्वी करून मराठा समाज हा एकजूट झाला आहे हे सिद्ध केले नांदगाव शहर बंद च्या दिवशी ग्रामीण भागातील मराठा तरुणांनी मोटरसायकली रॅली काढून नांदगाव बंद चे आवाहन केले होते प्रशासनाच्या वतीने तालुक्याचे प्रभारी – तहसीलदार प्रमोद मोरे यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली असता उपोषण कर्त्यांनी कुणबी नोंद शोधण्याचे हजार रुपये घेणाऱ्या रेकॉर्ड रुम मधील जाधव नावाच्या कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावले व त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली तसेच मद्यप्राशन करून उपोषण कर्त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या राठोड डॉक्टर वर कठोर कारवाईची मागणी केली महाराष्ट्र शासनाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला असून मराठा समाज हा आर्थिक शैक्षणिक व सामाजिक मागास आहे हे सिद्ध केले आहे याचा फायदा सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात होणार आहे ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडले नाहीत व ते यातही बसत नाही त्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे महसूल खात्यास आज पर्यंत सापडलेल्या सतावन्न (57 लाख) लाख नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे येत्या 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात सगेसोयरीच्या अध्यदेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही तो पर्यंत आंदोलन उपोषण सुरूच राहणार असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केलेला आहे या आंदोलनात सकल मराठा समाज नांदगाव व अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुक्यातील मराठा तरुण व मराठा योद्धे मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.

