loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

Feb 17, 2024

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे सगेसोयरे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी नांदगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनास आज रविवारी 9 दिवस पूर्ण होत आहे दरम्यान आमरण उपोषण करते यांची प्रकृती चिंताजनक झाली असून दोन्ही  उपोषणकर्त्यांची शुगर लेवल कमी झाल्याने दोघांनाही चक्कर येत असून भास्कर झाल्टे यांचा रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट होण्यास सांगितले असता दोन्ही उपोषणकर्त्यांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या 09 दिवसांपासून सातत्याने ग्रामीण भागातील विविध गावकरी भजनी मंडळांनी उपोषण स्थळी रोज रात्री 09 ते 12 पर्यंत भजनाच्या माध्यमातून आंदोलनास बळ दिले आहे यात साकोरे, परधडी,जळगाव खुर्द, बाणगाव बुद्रुक आणि नांदगाव शहरातील हमालवाड्यातील जय बाबाजी भजनी मंडळाचा प्रमुख सहभाग होता नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजवंत मराठा तरुणांचा या आंदोलनातील सक्रिय सहभाग हा लक्षणीय ठरला आहे महाराष्ट्र बंद मध्ये सुद्धा नांदगाव व मनमाड शहराने 100% बंद यशस्वी करून मराठा समाज हा एकजूट झाला आहे हे सिद्ध केले नांदगाव शहर बंद च्या दिवशी ग्रामीण भागातील मराठा तरुणांनी मोटरसायकली रॅली काढून नांदगाव बंद चे आवाहन केले होते प्रशासनाच्या वतीने तालुक्याचे प्रभारी – तहसीलदार प्रमोद मोरे यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली असता उपोषण कर्त्यांनी कुणबी नोंद शोधण्याचे हजार रुपये घेणाऱ्या  रेकॉर्ड रुम मधील जाधव नावाच्या कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावले व त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली तसेच मद्यप्राशन करून उपोषण कर्त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या राठोड डॉक्टर वर कठोर कारवाईची मागणी केली महाराष्ट्र शासनाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला असून मराठा समाज हा आर्थिक शैक्षणिक व सामाजिक मागास आहे हे सिद्ध केले आहे याचा फायदा सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात  होणार आहे ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडले नाहीत व ते यातही बसत नाही त्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे महसूल खात्यास आज पर्यंत सापडलेल्या सतावन्न (57 लाख) लाख नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे येत्या 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात सगेसोयरीच्या अध्यदेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही तो पर्यंत आंदोलन उपोषण सुरूच राहणार असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केलेला आहे या आंदोलनात सकल मराठा समाज नांदगाव व अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुक्यातील मराठा तरुण व मराठा योद्धे मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.