नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप होतो हा जंगली वाघ जेव्हा मानवाला जंगलाचे महत्व पटवून देतो तेव्हा
मानव आणि जंगल
मानवाला जंगलाच्या संरक्षणात योगदान देणे आवश्यक आहे. जंगलातील स्वच्छतेचे रक्षण करण्याचे आपल्याला धर्म असावे, कारण जंगल हे मानवाच्या व प्राण्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. जंगलात स्वच्छता ठेवण्याच्या द्युतिकांचे स्थिरता आणि वातावरणाची सुरक्षा करणे मानवाला लाभ करू शकते.पण मानव जर जंगलात जाऊन वसुंधरेच्या सानिध्यात कचरा फेकुन जंगलाचे पाविञ्य नष्ट करणार असेल तर मानवा एवढा आळशी आणी कर्तव्य शुन्य कोण असेल?
जंगलात निवास करणारे प्राणी ह्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाकडे आहे. जंगलाची स्वच्छता आणि संरक्षण करणे ह्यांच्या आत्मिक संतोषाचे कारण बनते. जंगलातील स्वच्छतेचे अभाव त्यांना संघर्षात आणि अन्यायात सामोरे आणू शकते.
एखाद्या समाजातील लोकांचे जंगल संरक्षणात अभाव असल्याने त्यांनी जंगलातील प्राण्यांच्या निर्वासनाच्या प्रकल्पांमध्ये भाग घेतला आणि स्वच्छतेच्या कामांसाठी लढण्यात मदत केली जाते.अशा मानवांना वंदन.
प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान भारतभर राबविण्याचे हाती घेतले आहे याच स्वच्छ अभियानाला हातभार लावण्याचे काम हे जंगलातील वाघाने केले आहे यातुन असे दिसते की मानवाला लाजवेल असे काम जंगलात वास्तव्याला असणार्या वाघाला कळते पण मानवाला नाही. प्लास्टिक बंदी असताना सर्रास वापर होतो .हीच पाण्याची प्लास्टिक ची बाटली कुणी पर्यटकाने ताडोबा जंगलात पाणी घेऊन गेले आणी ती रिकामी बाटली पाण्याच्या डबक्यात फेकुन दिली ती फेकलेली बाटली तडोबा जंगलातील पाणी पिणाऱ्या वाघाला दिसली त्याने बाटली तोंडात धरुन पाण्यातून बाहेर फेकली ही बाब एका वाघाच्या लक्षात येते पण निर्लज्ज मानवाच्या का लक्षात येत नाही वाघाने जंगलात देखील स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे नाहीतर जंगल सफारीला जानारा मानूस खाण्यापिण्याचे खाद्यपदार्थ सोबत घेऊन जातो आणी रिकामे झालेल्या बाटल्या किंवा प्लास्टिक पिशव्या तशाच जंगलात टाकून देतो .स्वच्छ अभियाना राबविले जातात पण ते बहुतांशी कागदावर आहे आजुन आनेक गाव हगणदारी मुक्त झाले नाही प्रत्येकाला घरासोबत शौचालय बांधून देण्याचा फतवा असताना लोक आजुन ही उघड्यावर दुर्गंधी करतात यामुळे आनेक रोगांना मानवाला सामोरे जावे लागत आहे .आनेक शौचालयांना शहरात सेफ्टी टँक नसल्याने मैला उघड्यागटारीतुन वाहत जाऊन किंवा साचून दुर्गंधीला आमंञन देत आहे .ताडोबा जंगलात फेकलेली प्लास्टिक बाटली तोंडात धरुन बाजूला फेकणार्या वाघाने मानवाच्या व पर्यटकांचे डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे .याची मानवाला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे .सर्पमिञ प्रभाकर निकुंभ यांनी मिळविलेला हा व्हिडिओ सर्वञ सोशल मिडीयावर फिरत आहे .

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....