मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन वोकेशनल विभागाचे प्रमुख बच्छाव सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक ढमाले संदीप यांनी मनोगत व्यक्त करताना संत गाडगेबाबा यांनी समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या विरोधात प्रबोधन केले मंदिरे बांधण्यापेक्षा शाळा बांधणीसाठी सहकार्य करणे गरजेचे आहेत त्यातून समाज शिक्षित होईल असे आवाहन संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून समाजाला सतत करीत असत. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे सर्व प्रशासकीय पदाधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...