loader image

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

Feb 23, 2024


नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय नांदगांव येथील बैठकित घेण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला नांदगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सक्रिय पाठिंबा देण्यात आला असून त्याची रूपरेषा देखील ठरविण्यात आली आहे .
तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने दि २२ रोजी नांदगांव येथील उपोषनस्थळी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले आंदोलनाची दिशा पुढील प्रमाणे

शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी ठिकाण:- हुतात्मा चौक नांदगाव,
वेळ:-सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत.रास्ता रोको

रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ठिकाण:- वखारी स्टँडवर वखारी ता,नांदगाव
वेळ:-सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा.पर्यंत.रास्तारोको

सोमवार दि २५ फेब्रुवारी रोजी ठिकाण:- रेल्वे ओव्हर ब्रिज वर,नगिना मस्जिद समोर मनमाड ता. नांदगांव
वेळ:- सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा पर्यंत.रास्तारोको

मंगळवार दि २७ फेब्रुवारी ठिकाण:- न्यायडोंगरी स्टँडवर न्यायडोंगरी ता.नांदगाव
वेळ:- सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा पर्यंत.रास्तारोको

बुधवार दि २८ फेब्रुवारी रोजी ठिकाण:- बाणगाव स्टँडवर बाणगाव ता.नांदगाव नांदगांव येवला रोडवर
वेळ:- सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा.पर्यंत.रास्तारोको

गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी ठिकाण:- बोलठाण स्टँडवर बोलठाण (घाटमाथा) ता.नांदगाव
वेळ:- सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा.पर्यंत.रास्तारोको

शुक्रवार दि १ मार्च रोजी ठिकाण:- हुतात्मा चौक, नांदगाव
वेळ:- सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा.पर्यंत. रास्तारोको नांदगांव ४० गाव हायवे वर

शनिवार दि २ मार्च रोजी ठिकाण:- रेल्वे ओव्हर ब्रिज वर,नगिना मस्जिद समोर, मनमाड अ.नगर मनमाड रोड
वेळ :- सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा.पर्यंत.रास्तारोको
(आंदोलनात सहभागी बांधवांसाठी चहा पाणी/सरबत/अल्पोपहार/स्नेहभोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे..तसेच रास्ता रोको आंदोलन जास्त वेळ असल्यामुळे मंडप व बसण्यासाठी चटाई,फायबर खुर्चांची व्यवस्था करण्यात आली आहे)
या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे..
सकल मराठा समाज नांदगाव
अखिल भारतीय मराठा महासंघ
च्या वतीने हे वृत्त प्रसिध्ीला दिले आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.