मनमाड :- नाशिक येथील महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळातर्फे दसा श्रीमाळी वैष्णव समाजात उत्कृष्ट कार्य करणा-यांना गौरविण्यात आले त्यात अखिल भारतीय पातळीवरचा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार येथील प्रतिथयश डाॕ.प्रताप गुजराथी यांना तर कवी व विक्रमी रक्तदाते प्रदीप गुजराथी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक येथील पलाश हाॕल काॕलेजरोड येथे नेत्रदीपक समारंभात पुणे येथील समाजसेवक व शासकीय लेखापरीक्षक श्री.राजूभाई गुजराथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल , श्रीफळ , स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
डाॕ. प्रताप गुजराथी यांनी किल्लारी येथे प्रत्यक्ष जाऊन केलेली वैद्यकीय मदत तसेच भूज भूकंपाच्या वेळेस केलेले अनमोल कार्य , गुही व कनासी येथील वनवासी कल्याण आश्रमात केलेली 31 वर्षांची नियमित आरोग्यसेवा व मोफत औषधांचे वाटप, एक वस्त्र मोलाचे यासाठी वापरण्यायोग्य कपड्यांचे संकलनासाठी काढलेली शहर मदत फेरी,
क-ही स्मार्ट व्हिलेज, लायन्स चिल्ड्रेन गार्डन, तसेच नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात सलग 18 दिवस तेथे राहून 8400 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व साडेसात लाख रुपयांचे औषधवाटप या नेत्रदीपक कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
कवी प्रदीप गुजराथी यांना त्यांनी 106 वेळा केलेले विक्रमी रक्तदान , ४० वर्षांपासून रक्तदानाच्या चळवळीत केलेले जनजागरण, आणीबाणीच्या प्रसंगी अर्ध्या रात्री रक्त उपलब्ध करुन शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे केलेले मानवतावादी कार्य,
स्व. आनंद दिघे साहेब हस्ते मिळालेला मानाचा रक्तकर्ण पुरस्कार , केंद्र सरकारचा मिळालेला नेहरु युवा पुरस्कार रक्तदानाचे प्रबोधन व्हावे म्हणून केलेली शेकडो व्याख्याने, रक्तगटांची युसास जीवन संजीवनी पुस्तिका. 1990 च्या दशकात रक्तदाता Directory काढणे ही विशेष बाब आहे.रक्तदानाचे प्रबोधन व्हावे म्हणून केलेली अनेक व्याख्याने
रक्तदान, घोषवाक्ये व उखाणे यावर लिहीलेले माहितीपर पुस्तक, रक्तदान शिबीरांचे यशस्वी आयोजन या योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले
प्रथमच झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी पुणे, मुंबई . नाशिक, अकोला, बाळापूर , शिरपूर , राजगुरुनगर , औरंगाबाद , कोपरगाव , बुरहानपूर , कोपरगाव, सिन्नर , येवला , चांदवड, मनमाड , खंडवा , इंदोर, मालेगाव , शहापूर, डोंगरगाव, जालना इत्यादी ठिकाणाहून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारार्थी जेव्हा पुरस्कार स्वीकारत होते तेव्हा खास अयोध्या येथुन मागविलेला शंख व त्या शंखाचा नादमधूर आवाज कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
प्रा.सुरेशभाई गुजराथी पुणे व सौ. माधवी गुजराथी नवसारी गुजरात यांनी पुरस्कारार्थींतर्फे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी एकूण 12 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विशेष बाब म्हणजे एकाच कुटुंबातून काका व पुतणे यांचे सामाजिक कार्य आणि त्याबद्दल मिळालेले पुरस्कार यांचे सामाजिक, कौटुंबिक स्तरा मधून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अशोकाचे प्रा.डाॕ. डी. एम. गुजराथी व कवी जगदीश देवरे यांनी केले.
मिळालेल्या रोख रक्कमेत 10, 000 टाकून डाॕक्टर प्रताप गुजराथी यांनी रोख 21000 रुपये तर प्रदीप गुजराथी यांनी रोख रक्कमेत 6000 रुपये टाकून 11000 रुपयांचे आर्थिक योगदान गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मंडळास दिले.