नांदगाव : मारुती जगधने. मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनास नांदगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. नांदगाव सकल मराठा समाजाने दि २४ रोजी नांदगाव येथील हुतात्मा चौकात तब्बल दोन तास रास्तारोको करण्यात आला. आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तप्त उन्हात शेकडो आंदोलक रस्त्यावर बसून होते. या प्रसंगी नांदगाव ४० गाव,छ.संभाजी नगर, येवला, मनमाड, मालेगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची नांदगाव पो नि प्रितंम चौधरी यांना पूर्व कल्पना असल्याने शहरातुन जाणारी वाहतूक अहिंसा चौकापासुन रोखण्यात आली होती. दोन तासानंतर १० मिनिटात रहदारी सुरळीत झाली.
दरम्यान रस्तारोकोमध्ये पाणी टँकर ,तेलटँकर,बस, शेतीमालवाहतुक करणारी वाहने, स्कुलबस आदी वाहने आडकली होती. रस्त्यावर सुमारे एक किमी अंतरावर वाहनांची रांग लागली होती. आंदोलकानी सगे-सोयरे यांचा आरक्षणात समावेश करावा ही मागणी प्रामुख्याने लाऊन धरली आहे .ओबीसीतुन आरक्षण मिळावे हि मागणी कायम ठेवली.
आंदोलनात सकल मराठा समाजाचे उपोषणकर्ते
विशाल वडगुले,राजु देशमुख, माजी नगर अध्यक्ष राजेश कवडे, जिप सदस्य रमेश बोरसे,माजी सभापती विलास आहेर,निलेश चव्हाण, महेंद्र बोरसे, तात्या बोरसे,खालकर दादा,लोखंडे दादा,नगरसेवक
नंरेंद्र काकळीज,रमेश काकळीज यांसह शेकडो सकल मराठा समाज कार्यकत्यांनी रास्तारोको आंदोलनात भाग घेतला .या दरम्यान एक आंदोलकाने फेकुन दिलेल्या अस्ताविस्त पडलेल्या पाण्याच्या बाटल्या जम करुन एक गोणीत भरुन आंदोलनातील स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
दरम्यान पो नि प्रितम चौधरी यांनी आपल्या ताफ्यासह हुतात्मा चौक,तर पो उ नि मनोज वाघमारे यांनी पोलीस कर्मचार्यासोबत अहिंसा चौकात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतीच गैरसोय झाली नाही. दुचाकी वाहतूक आंदोलन दरम्यान सुरळीत होती.
दरम्यान तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले .