loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात एक दिवशीय ज्येष्ठ नागरिक शिबिर संपन्न

Feb 24, 2024



मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे व विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत एक दिवशीय ज्येष्ठ नागरिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटन पर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य निकम यांनी नवी पिढी व जुनी पिढी यांच्यामधील फरक व ऋणानुबंध उदाहरणा सकट सांगून श्रोत्यांची मने जिंकली.
    या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर निलेश राठी, लायन हर्षदजी गद्रे,  एडवोकेट रमेश अग्रवाल, व मनमाड महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे उपस्थित होते.डॉ.निलेश राठी यांनी जेष्ठ नागरिकांचे आरोग्य या विषयावर आपले मत व्यक्त करत असताना ज्येष्ठ नागरिकांनी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे तसेच रोज  योगासने करावीत व वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी.आपली स्मृती चांगली राहण्यासाठी वाचन व सतत कार्यशील राहिले पाहिजे असा सल्ला त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिला. श्री हर्षद गद्रे यांनी भारतीय कुटुंब व्यवस्था व पाश्चिमात्य कुटुंबव्यवस्था यातील फरक समजावून सांगितला व यातील ज्येष्ठांचे स्थान काय आहे व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलती विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी जेष्ठ नागरिक दिनाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला.   त्याचबरोबर त्यांनी आपल्या व्याख्यानात नवी पिढी व जुनी पिढी यांच्यात समन्वय निर्माण होणे खूप महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. एडवोकेट रमेश अग्रवाल यांनी जेष्ठ नागरिक व कायदा या विषयावर बोलताना ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे व त्यातील तरतुदीविषयी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी सल्ला दिला की कोर्टाची पायरी ही शेवटची पायरी असते त्यामुळे तिथपर्यंत शक्यतो कुणी जाऊ नये व आपापसात समजुतीने सर्व  अडचणी सोडवून घ्याव्यात. यामुळे नवीन कायदे करण्याची गरज भासणार नाही किंवा असलेल्या कायद्यांची गरज देखील पडणार नाही.हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर जेवाय इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे ज्येष्ठ नागरिकांशिवाय समाजाचा विकास होऊ शकणार नाही असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दैनिक जनश्रद्धा चे संपादक नरेश गुजराथी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी समाजामध्ये वावरत असताना अपडेट राहणे गरजेचे आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मुलांसाठी जगता जगता आपण स्वतःसाठी देखील जगलं पाहिजे व जीवनाचा आनंद घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. व पैशाचा विनियोग जीवन जगण्याचा आनंद घेण्याकरता करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील बहि:शाल विभागाच्या कार्यवाहक प्रा. सौ.कविता काखंडकी यांनी केले त्यांनी जेष्ठ नागरिक शिबिराच्या आयोजनाचा उद्देश सर्वांसमोर मांडला. या याप्रसंगी श्री नरेंद्र कांबळे, श्री माणिक बनसोडे, श्री पगारे, श्री दिलीप आव्हाड, श्री पद्मने ,श्री सोमनाथ चिंचोले , सौ कुंदा कुलकर्णी, सौ पुष्पा सोनवणे या उपस्थित जेष्ठ नागरिकांनी या शिबिराविषयी आपले मत सर्वांसमोर व्यक्त केली व अशा प्रकारच्या शिबिरांची नितांत गरज आहे असे नमूद केले.याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती च्या समितीच्या  सदस्या अलकाताई शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघ मनमाड, यांचे पदाधिकारी व सदस्य, नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन मनमाडचे पदाधिकारी व सदस्य,लोकायत ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मनमाड यांचे पदाधिकारी व सदस्य, लायन्स क्लब मनमाडचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. संदीप ढमाले यांनी केले तर आभार  अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.गणेश जावळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यश देडगे, उमर राठोड, तेहजीब शेख, तेजल पानसरे, रोहित निकम, आवेश टकारी. तुषार जगताप, सोफियान शेख, या विद्यार्थ्याचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमातिशय उत्साहात संपन्न झाला.


अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.