नांदगाव : मारुती जगधने नांदगाव – मालेगांव रोड व नांदगाव – मनमाड रोड वरील बेकायदेशीर अतिक्रमणे करुन रहदारीला व फुटपाथवर केलेली अतिक्रमणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच जागेवर केलेली अतिक्रमणे नोटीस मिळाल्याच्या १५ दिवसात काढावी अन्यथा या संबधीत होणाऱ्या परिणमाची जबाबदारी अतिक्रमण धारकांवर राहिल असे नोटीस व्दारे कळविण्यात आले आहे या मुळे शेकडो अतिक्रमण व्यावसायिकां वर व कुटुंबावर बेरोजगारीचा व रोजरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
दि १६/२/२४ रोजी दिलेल्या नोटीस व्दारे म्हटले की
राष्ट्रीय महामार्ग नं ७५३ चे लगत दुकान,हाॅटेल आदी लहान मोठे व्यवसाय करणे व बांधकाम करणे बाबत
आपणास या नोटीस व्दारे कळविण्यात येते की राष्ट्रीय महामार्ग ७५३ लगत सा क्र १०३/०००ते नं १४७,४२०,मध्ये रस्त्याच्या डाव्या ,उजव्या बाजूला आपण विना परवाना सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवर दुकान ,टपरी ,हाॅटेल,हाॅटेल टाकून बांधकाम करुन अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेले आहे .ते राष्ट्रीय महामार्ग नियंञण कायदा (जमिन आणी वाहतूक)२००२ व मुंबई महामार्ग अधिनियम १९५५ पथकिणारी वर्ती समांतर रेषा नियमानुसार बेकायदेशीर कृत्य आहे.तरी आपणास नोटीसव्दारे सूचित करण्यात येते की नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसाचे आत सदरहुन घर दुकान टपरी हॉटेल त्वरीत
हटवावे अन्यथा या उपविभागामार्फत पोलीस खात्याच्या मदतीने सदर जागेवरील अतिक्रमणे कोणतीही पुर्व सुचना न देता काढण्यात येईल व त्यावर होणारा खर्च आपणा कडुन वसूल करण्यात येईल व सदर ठिकाणी होणार्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी असे नोटीसव्दारे उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग २ नासिक यांनी कळविले आहे.
दरम्यान स्थानिक ग्रांमपंचायतीने देखील रहदारील ला व सार्वजनिक जलवाहीनीला अतिक्तमण धारकामुळे अडथळे निर्माण होत आहे .तसेच रस्ताचौफुलीवरुन रस्ता ओलांडताना वाहन चालकाला वळणावरील मार्ग दिसत नसल्याने होणारे अपघात आदी कारणास्तव झालेल्या तक्रारी आदी कारणास्तव सदर अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...