मनमाड – आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच निधी मात्र पूर्ण खर्ची पडला.नगरचौकी पुन्हा तहानलेलीच राहिली.आज मात्र तालुक्याचे आ.सुहास कांदे यांच्या भगीरथ प्रयत्नाने नगरचौकीचा भिजत घोंगडे पडलेला पाणीप्रश्न सुटल्यात जमा झाला आहे.आज अंतर्गत पाईप लाईन कामाचे भूमिपूजन आ.सुहास आण्णा कांदे यांच्या सौ.अंजुमताईकांदे यांचे हस्ते संपन्न झाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड – करंजवन पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास गेले आहे.आणि शहर अंतर्गत पाईप लाईन कामाला ही सुरुवात झाली असून,त्या अनुषंगाने नगरचौकी येथील अंतर्गत पाईप लाईन कामाचे भूमिपूजन सौ.अंजुम कांदे , राजाभाऊ अहिरे, सचिन दराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सचिन दराडे यांनी आ.सुहास कांदे करत असलेल्या कामांची माहिती दिली तर सौ.कांदे यांनी सुहास अण्णांना अशीच साथ कायम द्या..मनमाड चा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे अभिवचन दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे,माजी नगरसेवक तथा उद्योजक सचिन दराडे,महिला आघाडीच्या सौ.विद्या जगताप,सौ.संगीता बागुल,सौ.पूजा छाजेड, लोकेश साबळे,अमजद पठाण,दिलीप सूर्यवंशी, संतोष सानप, राजू काकड,भाऊसाहेब सानप, संजय काकड,कैलास धात्रक,अशोक सानप,रामदास निरभवणे,शिवनाथ झालटे,राजाभाऊ वाघ,संतोष धात्रक,सौ.सरुबाई पटाईत,सोनाली गाढे,शशी सोनावणे,आदिंसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
