loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

Feb 25, 2024

मनमाड –  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळे प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून म.स.गा. महाविद्यालयाचे उपप्राचार्य राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीष सोनवणे व इंग्रजी विभागाचे प्रा डॉक्टर राज त्रिभुवन उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन पर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे व जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेणे संघर्ष करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले .मसगा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष सोनवणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे संघर्षाशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आयुष्याकडे बघत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे तसेच ज्या व्यक्ती उज्वल भविष्याची वाट दाखवतात त्यांच्याशी व्यक्तीने संगत करावी, व्यक्तीने नेहमी सत्य बोलले पाहिजे चांगली पुस्तके वाचली पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले त्यानंतर प्रा. डॉक्टर राज त्रिभुवन यांनी मनोगत व्यक्त करताना दुःखामध्ये ज्या व्यक्ती नेहमी साथ देतात त्याच व्यक्ती खऱ्या मित्र असतात, शिक्षण हेच व्यक्तीच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणत असते असे मत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा. डॉ. विष्णू राठोड यांनी केले त्यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉक्टर जे.वाय इंगळे डॉ. भरत शेवाळे व विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका अलका नागरे यांनी केले तर आभार प्राध्यापिका विजया सोनवणे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.