मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या 3 एनसीसी छात्रांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली.मनमाडमहाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने आपली परंपरा कायम राखत विभागाचे सिनियर अंडर ऑफिसर अतुल गोरख लहाणे, कॅडेट पंकज संतोष अहिरे, कॅडेट वैभव मंजिराम सोनवणे या छात्रांनी अग्निवीर होण्याचा बहुमान मिळविला.सर्व छात्रांनी आपल्या मनोगतामध्ये एनसीसी मुळे शारीरिक बौद्धिकज्ञान आणि सर्वात महत्वाचे भरतीसाठी आवश्यक असलेली शिस्त व वेळेचे महत्व एनसीसीमुळे अग्निवीर होण्यासाठी कामी आला.एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रकाश रमेश बर्डे यांनी प्रास्ताविकात यशस्वी छात्रांचा परिचयकरून देत अग्निवीर स्कीम बाबत उपस्थितांना माहिती दिली. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष.एन.निकम यांच्या हस्ते एनसीसी छात्रांचा सत्कार करण्यात आला व भविषात महाविद्यालयातर्फे कोणतीही शैक्षणिक मदत लागल्यास ती पुरवली जाईन असे कडेट्सना आश्वासन दिले. निवड झालेल्या छात्रांना संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय डॉ.प्रशांतदादा हिरे,संस्थेच्या कोषाध्यक्षा स्मिताताई हिरे संस्थेचे समन्वयक माननीय डॉ.अपूर्वभाऊ हिरे व 50 महाराष्ट्र एनसीसी छ.संभाजीनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल वाय. विजयकुमार यांनी कडेट्स यांना पुढील वाटचालीस सुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी IQAC समन्वयक डॉ. एम एम अहिरे,डॉ.जी एल शेंडगे, प्रा.डी व्ही सोनवणे, प्रा.एम सी नागरे,क्रीडा संचालक एस एस वराडे आदी उपस्थित होते.

राशी भविष्य : १८ सप्टेंबर २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...