loader image

बळीराजा कृषी प्रदर्शनास भेट

Feb 26, 2024


 

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड मनमाडच्या वाणिज्य विभागाची कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड, आयोजित ‘ बळीराजा कृषी प्रदर्शनास ‘ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सुभाष निकम सर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. दीपकजी चंद्रकांतजी गोगड यांनी विद्यार्थ्यांना कृषी प्रदर्शना विषयी परिपूर्ण अशी माहिती दिली. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच असे जिल्हास्तरीय बळीराजा प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले असून बहुसंख्य लोकांना त्याचा लाभ होत आहे असे गोगड साहेबांनी सांगितले तसेच भविष्यात शेतकरी त्याचे अजून उपक्रम राबवु , असे यावेळी ते बोललेत , त्यांनी कृषी उत्पादने कशा पद्धतीने तयार करण्यात येतात , त्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो विषयी सर्व माहिती दिली . वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस.डी.थोरे , डॉ.आरती छाजेड ,डॉ.व्ही.एस नजरधने ,प्रा.सुनिल मुसळे , प्रा.समाधान सूर्यवंशी यांचे या अभ्यास भेटीसाठी मोलाचे सहकार्य लाभले. वाणिज्य विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.