loader image

भारतीय रेल्वे 554 स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजने मध्ये मध्य रेल्वे भुसावळ मंडलातील रापली अंडरपास निर्माण विकास कामाचे  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने द्वारे शुभारंभ व लोकार्पण  कार्यक्रम संपन्न

Feb 27, 2024




अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय रेल्वे द्वारे 554 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास व 28 नवीन रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन 1500 पेक्षा जास्त रोड रेल्वे ब्रिज उड्डान पूल व अंडरपास यांचा लोकार्पण कार्यक्रम  देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे संपन्न झाला याच अंतर्गत मध्य रेल्वे च्या भुसावळ मंडल अंतर्गत येणाऱ्या रापली अंडरपास निर्माण कार्याचा लोकार्पण सोहळा वागदर्डी ता चांदवड येथील सरस्वती विद्या प्रसारक मंडळ वाघदर्डी संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये रेल्वे द्वारे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी या संस्थे चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जैन होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे च्या सिकंदराबाद क्षेत्रीय (झोनल)समिती सदस्य नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष तथा स्थानीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य संदीप नरवडे,भाजपा जेष्ठ नेते कांतीलाल लुणावत, शाळेचे मुख्याध्यापक संतोष भराडे  आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या शाळे चे शिक्षक सोनवणे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वा मध्ये गेल्या 10 वर्षात भारतीय रेल्वे ने वेगवान आणि नेत्रदीपक प्रगती केली आहे  यामुळे प्रवासी व नागरिकांना मोठया सुविधा सेवा मिळणार आहेत असे आपल्या प्रमुख अतिथीय मनोगत मध्ये सांगत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद व्यक्त केले या प्रसंगी सरस्वती विद्या प्रसारक शाळेच्या व जिल्हा परिषद शाळा वागदर्डी च्या शाळेतील विध्यार्थ्यांनी विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी भारतीय रेल्वे तर्फे विध्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन रेल्वे चे आनंद गांगुर्डे  (वाणिज्य सुपरवायझर )तुषार मतकरी (वाणिज्य सुपरवायझर )प्रविण भालेराव ( वाणिज्य सुपरवायझर )राजेंद्र कुलकर्णी (चीफऑफिस सुप्रिटेंड )दत्तात्रय ठोंबरे – सेकशन अभियंता(PWI)
P K मिश्रा – सेकशन अभियंता (TELE)कौतिक कोंढरे – अभियंता (ETL G)बाळासाहेब झाल्टे – अभियंता (ETL G)दुबे साहेब (RPF PI)युनिट नंबर 06 चे सर्व ट्रॅकमन कर्मचारी यांनी केले तर सरस्वती विद्या प्रसारक मंडळ वाघदर्डी संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  भराडे एस के,गांगुर्डे एस जे, सोनवणे पीजी, पाटील एस वाय, निफाडकर एपी, श्रीमती पवार एस एन,श्री वाजे एन एन, बच्छाव एन डी,
पगार एस ए, एंडाईत एस एस,पगार एन एस,पगार एसटी तसेच जिल्हा परिषद शाळा वाघदर्डी चे कुमावत सर,चौधरी सर,जिल्हा परिषद शाळा रापली चे काळे सर या शिक्षक वृंदा चे अनमोल सहकार्य या कार्यक्रमाला लाभले रेल्वे अधिकारी आनंद गांगुर्डे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला वागदर्डी, रापली परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपास्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.