loader image

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

Feb 27, 2024



नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा करीत आहे या मुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळेल माञ झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले .
तालुक्यात दि २७ रोजी दुपारच्या सुमारास ढगांच्या गड-गडाटा सह पावसाचे आगमन झाले यात शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली
  या वादळवार्याच्या व काही प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याची वार्ता आहे या बेमोसमी पावसाने डोंगळे,आंबामोहर ,शेवगा ,फळ पिकांचे व द्राक्षे पिकांचे नुकासान झाले तसेच साठवून ठेवलेला जनावरांच्या वैरणीचा
चारा, कडबा कुट्टी पावसात भिजला त्यामुळे जनावरांच्या वैरणीची चिंता पशुप्रेमींना निर्माण झाली.गत दोन दिवसा पासून लोक असाहाय्य उकाड्याने हैराण झाले होते झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. तालुक्यात
मनमाड शहर आगस्ती डोंगर,हिसवळ,    मोहेगाव,बेजगाव ,कर्हि, एकुळी, हिसवळ खु!! बु!!,,नांदगाव शहर व तालुक्याच्या पश्चिंम, दक्षिण भागाला पावसाने झोडपले यात गहु, हरभरा,या पिकांचे नुकसान झाले तर वादळाने अंबामोहर कैरी गळून पडली.
तालुक्यात सर्वच भागाना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासन पाणीटंचाईवर पुरेशी उपाययोजना करत नसल्याची नाराजी नागरीक  व्यक्त करतात.शहरा लगतच्या गिरणानगर,मल्हारवाडी, श्रीरामनगर ,फुलेनगर ,हिंगणवाडी, गंगाधरी या गावांना कृञींम पाणी टंचाई निर्माण झाली आहे ३० दिवस झाले पण नळाला पाणी आले नाही दोन महिण्यापासून नांदगाव शहर व लागून असलेल्या सात ग्रांमपंचायतीना पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला पाण्याच्या टँकरसाठी नागरीकाना पैसे मोजावे लागत आहे .
होत असलेल्या बेमोसमी पावसाचे छतावरुन गळनारे पाणी साठविण्याची वेळ नागरिकावर  आली आहे .बे- मोसमात देखील नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा करीत आहे .नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने पावासचे पाणी साठवण्याची वेळ शहरवासीयावर आली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.