मनमाड – मनमाड येथील बी जी दरगुडे पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट होती आणि निमित्त होते ते स्नेहसंमेलनाचे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून मनमाड शहराचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय लांडगे,माजी आमदार जगन्नाथ धात्रक , मार्केटकमिटी संचालक व नगरसेवक गणेश धात्रक, माजी नगर सेवक संतोष बळीद, इंजीनियर अनिल दराडे , ॲडवोकेट शशिकांत व्यवहारे , प्रसिद्ध डॉक्टर सुहास जाधव आर्टिस्ट आसिफ मंसूरी उपस्थित होते .
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीचे पूजन करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. काव्यांजली केदारे कु. ईश्वरी आहेर यांनी सुरेख रित्या इंग्रजी भाषेत उत्तम रित्या पार पडले
कार्यक्रमात वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये (ऑलंपियाड, इंटरमीडिएट, सायन्स एक्झिबिशन, स्कॉलरशिपआणि मैदानी खेळक) यश प्राप्त नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस ए तांबोळी यांनी शाळेचा शैक्षणिक अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या थीमवर आधारित विविध नृत्याचे व कलेचे अविष्कार सादर केले त्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका, लावणी कोळीगीत व लहानग्यांनी सादर केलऐले नटखट डांस ने उपस्तीताचे मन जिकली.
या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष श्री निलेश दरगुडे व प्रदीप दरगुडे तसेच संचालक श्री भागवत दरगुडे, श्री शंकर सानप ,सौ सुलोचना दरगुडे, संगीता नागरे, वसुंधरा नाईक उपस्तीत होते व विद्यार्थीचे व शाळेची प्रगती व वर्ष भरातील विविध यशाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक सौ मारणेमॅडम , मुख्याध्यापक वाघ व तांबोळी,व सर्व शिक्षिका क्रांती, कोमल, काजल , नरोटे, सोनिया, शेलार, देसाई, लाटे, चौधरी, आणि शिक्षकेतर कर्मचारी मयुर, शिंदे, जाधव, सागर, या सर्वांनी खूप मेहनत घेऊन यशवी पार पाडला व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्तीत राहून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देऊन उत्साह वाढवला व कार्यक्रमाविषयी आनंद व समाधान व्यक्त केले.
