लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित सोनाराच्या दुकानात भरदिवसा पोत चोरी करणारा चोर ग्राहकांनी दुकानदारांच्या मदतीने पकडला.
मंळगवारी दिनांक २७ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दुकानदार ग्राहकाला पोत आणि सोने व चांदीची दागिने दाखवत असतांना तोंड बांधलेला एक चोरटा दुकानात शिरला. त्यानंतर त्याने दुकानदार आणि ग्राहकाची नजर चुकून तीन तोळ्याची अंदाजे दोन लाख रुपये किंमतीची पोत उचलून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र दुकानात असलेल्या ग्राहकाने या चोरट्याला पकडले. त्यानंतर दुकानदारही पुढे आले. त्यामुळे या चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला. हा चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात असलेल्या सीसीटिव्ही कॉमेऱ्यात कैद झाला. हा चोरटा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...