मनमाड – ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय नाशिक, जिल्हा अधिकारी कार्यालय नासिक , महानगर पालिका नासिक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक व सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिन तथा कुसुमाग्रज (स्वर्गीय वि. वा. शिरवाडकर )यांचे 112 व्या जयंती निमित्ताने नाशिक ग्रंथोत्सव 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. या ग्रंथोत्सव 2023 कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय उपायुक्त रमेश काळे यांचे हस्ते करण्यात आले तर सहाय्यक ग्रंथालय संचालक तथा ग्रंथालय विभागीय अधिकारी सचिन जोपुळे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिप अविनाश येवले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडखे,सावाना चे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, प्रमुख कार्यवाह देवदत्त जोशी, कार्याध्यक्ष ऍड अभिजित बगदे, जयप्रकाश जातेगांवकर, प्रेरणा बेळे, गणेश बर्वे, मंगेश मालपाठक, संजय करंजकर, नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अजय शहा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षा पासून व्हाट्सअप, फेसबुक, ईस्टग्राम, ट्टीवीटर या सारख्या सोशल मीडिया च्या आक्रमण काळात ही वाचन संस्कृती जतन करीतव्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक, साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात वाचक चळवळीत दिपस्तंभा सारख्ये कार्य करणाऱ्या सन 1915 साली स्थापन झालेल्या आणि 110 वर्षा ची शतकोत्तर वाटचाल करीत वाचकांना सेवा देणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय चा शासनाच्या च्या वतीने विभागीय उपायुक्त रमेश काळे यांचे हस्ते सन्मान चिन्ह व ग्रंथ देऊन गौरव सत्कार करण्यात आला मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा माजी अध्यक्ष गौतम संचेती, जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे, प्रज्ञेश खांदाट वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी यांनी वाचनालया तर्फे हा गौरव सत्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले. गत 110 वर्षात मनमाड सार्वजनिक वाचनालयाने वाचक चळवळ जिवंत ठेवणे साठी विविध सामाजिक, साहित्य विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत त्यात विध्यार्थ्यांन मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून 60 वर्षा पेक्षा जास्त कालावधीत दरवर्षी अखंडित पणे मनमाड सार्वजनिक वाचनालय आंतर शालेय निबंध, कथाकथन, आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करीत आहे मनमाड सार्वजनिक वाचनालया या निःस्वार्थ कार्याचा शासनाने प्रथमच गौरव सत्कार केला आहे मनमाड च्या सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीत ही अभिमान ची बाब आहे मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.