संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांना भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पहिल्या यादीमध्ये चांदणी चौक दिल्ली या मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाने व्यापाऱ्यांना दिलेल्या प्रतिनिधीत्व बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे . प्रवीणजींच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय भारतातील व्यापाऱ्यांचा प्रश्नाच्या व समस्येचा आवाज संसदेत दिल्लीत दरबारी मांडून सोडवला जाईल.प्रवीण खंडेलवाल यांचा चांदणी चौक दिल्लीतून विजय सहज मानला जात आहे.व्यापाऱ्यांना दिलेल्या उमेदवारी प्रतिनिधित्व बद्दल महाराष्ट्र केट सचिव कल्पेश बेदमुथा, मनमाड केट चे अध्यक्ष चेतन संकलेचा , उपाध्यक्ष योगेश भंडारी , सचिव कुमार मेहानी यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...