loader image
[ays_poll id=7]

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

Mar 4, 2024


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे. पहिल्या टप्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले, आणि आज तिसऱ्या टप्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्यात भरवीर ते इगतपुरी या २५ किमी अंतराचे लोकार्पण झाले आहे. आतापर्यंत ६२५ किमी. रस्ता पूर्ण झाला आहे.

लोकार्पण सोहळ्या प्रसंगी मंत्री डॉ. भारतीताई पवार, मंत्री छगन भुजबळ, आ. हिरामण खोसकर, माजी आ. काशिनाथ मेंगाळ, एमएसआरडीसीचे अधिकारी कर्मचारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे राहणीमान सुधारावे याकरिता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची निर्मिती केली आहे.

समृद्धी महामार्गाशी ग्रामीण भागाचा कनेक्ट वाढून रोजगार निर्माण होणार आहे. समृद्धी महामार्ग पंतप्रधानांचे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. महामार्ग पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नमूद करण्यास अभिमान वाटतो की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जी.डी.पी) महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे.

महाराष्ट्र हा जसा गावकुसांच्या अनवट घाटवाटांचा प्रदेश आहे. तसाच तो महानगरांच्या वेगवान महामार्गाचाही प्रदेश आहे.
राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांतर्गत रस्ते असे रस्त्यांचे अखंड विणलेले जाळे आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेत आहेत.

आंतरराष्ट्रीय शहर अशी ओळख मोठ्या अभिमानाने मिरवणारे मुंबई असेल किंवा वेगाने प्रगतीच्या दिशेने झेपावणारी राज्याची उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळ, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे. राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली गेल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक आली आहेत.

समृद्धी महामार्गावर ठराविक ठिकाणी वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, तसेच १३८.४७ मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प देखील उभारण्यात येत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण 24 जिल्ह्यांना जोडले जात आहोत. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

पायाभूत सुविधांना एक मानवी स्पर्श देणारं सरकार सध्या राज्यात आणि देशात आहे. आता रोड कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. लवकरच हायस्पीड रेल्वे पण होणार आहे. येणाऱ्या काही महिन्यात हा महामार्ग मुंबईशी जोडला जाईल तेव्हा वाहतुकीचा भार हलका होणार आहे, आपला प्रवास सुककर होईल यात शंका नाही.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.