loader image

दिलीप दादा पाटील – एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

Mar 6, 2024


एका ड्रायव्हरचा प्रेरणादायी प्रवास

त्यांचे वडील एक पोलीस कॉन्स्टेबल

कधीतरी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये
बदली होऊन आले आणि इथलेच झाले

मोठं कुटुंब चार पाच भाऊ बहिणी,
त्या काळचा जेमतेम पगार,
म्हणून आर्थिक परिस्थिती बेताचीच

हे सर्वात थोरले,
म्हणून कौटुंबिक जबाबदारी लवकरच ओळखली

शिक्षण सोडून रोजीरोटीसाठी
कामाला सुरुवात केली

पण करणार तरी काय ?असा प्रश्न होता

हे हौशी ने ड्रायव्हिंग शिकले
आणि चक्क
ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरीही सुरू केली

भारदस्त व्यक्तिमत्व ,
निर्भीड रांगडा मराठा गडी,
नेतृत्व गुण आणि चळवळ्या माणसाला शांत बसवत नाही

या माणसाला काळाचे पावलं लवकर ओळखू येत असावेत

क्रिडा, समाजकारण ,
राजकारण, आणि अर्थकारण
याची यांना
कमी वयातच जाण असावी
म्हणून यांनी
खटपट करून … गाड्या घेऊन
ट्रान्सपोर्ट व्यवसायाला सुरुवात केली

ईकडे कुटुंबातील खाणारी तोंडं वाढत होती
आणि यांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस येत होते

आपण भले
आणि आपला धंदा बरा
आणि आपला संसार बरा
असं सर्वसामान्य माणसाचं जिणं त्यांना मंजूर नव्हतं

त्या काळात भांडवल नसणारे
स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्नं ही पाहू शकत नसत
सरकारी बँकांकडून कर्ज मिळवण्यातच
सारी उमेद खर्ची पडत असे हा अनुभव पदरी होता

सर्वसामांन्य व्यावसायिकाची फरफट थांबावी
या हेतूने त्यांनी मित्र मंडळीला
एकत्र करून पतसंस्थेची स्थापना केली

मनमाड शहरात
एक आर्थिक चळवळीचं रोपटं लावलं
आज त्या भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचा वटवृक्ष बहरलाय

यांना राजकारणही खुणावत होतं ,
प्रथम हे नगरसेवक ..
मग नगराध्यक्ष ही झाले …
नगराध्यक्ष पदाच्या काळात
ऐन सणासुदीच्या काळात
कामगारांनी केलेल्या संपा बरोबर
यांनी कसे दोन हात केले
याची एक सुरस कथाच आहे
पण ती नंतर कधीतरी …

कुटुंबाचा पसारा कितीही वाढला
तरी यांचे कुटुंबाचे निर्णय सामूहिक असत
एकत्र कुटुंबातला जिव्हाळा ,
सुसंवाद आणि कौटुंबिक एकीची ताकद
कशी निर्माण करावी हे यांच्या कडून शिकावं

नंतर यांना मा. आमदार डॉ वसंतराव पवारांनी
त्यांच्या पॅनल मध्ये घेऊन
मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संचालक मंडळात घेतलं
हा यांच्या शिरपेचातला मनाचा तुरा ठरेल

या माणसाचा राजकारणातला संयम वाखाणण्या जोगा,
सर्व सगे सोयरे मी व्याही मंडळी राजकारणातले धुरीण असूनही
यांनी शक्य असूनही आमदारकीचं स्वप्नं पाहिलं नाही
की तिकीटा साठी हुजरेगिरी केली नाही

-या वेळेस तर त्यांनीं म विं प्र ची उमेदवारी ही नाकारली….*
राजकीय नेतृत्वाने चालून आलेली सत्ता नाकारणे ही गोष्ट विरळाच….
पण दिलीप दादांना सत्तेचा लोभ नव्हता हे लक्षांत यावे

आपल्या करिअर ची सुरवात
ड्रायव्हर म्हणून करणारा हा माणूस ….
आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या,
आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचा सारथी झाला

आज “त्यांचं कुटुंब” ज्या उंचीवर आहे
त्याचं कारण म्हणजे
या कुटूंबाचा प्रमुख आधार स्तंभ !!
“मा. दिलीप दादा पाटील”

तुमच्या आमच्या साठी प्रेरणादायी
आणि मार्गदर्शक ठरावा
असा जिता जागता दीपस्तंभ आज हरपला

आज माजी नगराध्यक्ष
माजी म वि प्र सदस्य दिलीप दादा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आणि ते अनंताच्या प्रवासाला निघालेत

 

दिलीप दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

🙏🙏🌸🌸🙏🙏

 

हेमंत गवळे


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.