loader image

पोषण पखवाड्या माध्यमातुन केली जात आहे लेक लाडकी योजनेची जनजागृती

Mar 10, 2024


बाल विकास प्रकल्प अधकारी (नागरी)नाशिक जिल्हा नाशिक मनमाड विभाग येथे दिनांक ९ मार्च २४ रोजी प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर पगारे तसेच मुख्य सेविका शितल गायकवाड मँडम यांच्या मार्गदर्शना खाली पोषण पखवाड्याचे उद्घाटन करण्यात आले.नांदगाव तसेच मनमाड विभागातील सेविका ताई आणि मदतनिस ताई यांनी रँलीचे आयोजन केले. तसेच पथनाट्य व्दारे पोषण पखवाड्याच्या थिमविषयी माहिती दिली.लेक लाडकी योजनेची माहिती दिली..दि.९ मार्च ते २३ मार्च २०२४ पर्यन्त या पखवाड्यातील १) पोषण भी पढाई भी.२)आदिवासी,पारंपारिक,स्थानिक आहार पध्दती.३) गरोदर महिलाचे आरोग्य आणि अर्भक व लहान मुलांचा आहार या थिमविषयी जनजागृती केली जाणार आहे.
या अभियाना अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातुन जन आंदोलनातुन लोकांचा सक्रीय सहभाग नोंदवुन पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल.सही पोषण..देश रोशन..


अजून बातम्या वाचा..

.